Taliban hangs 4 dead bodies in Herat city  Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबान्यांची गुन्हेगारांना क्रूर शिक्षा,चौघांना गोळ्या घालत भर चौकात लटकवले

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानी (Taliban) शिक्षा परत आल्याचे समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात (Afghanistan) पुन्हा एकदा तालिबानी (Taliban) शिक्षा परत आल्याचे समोर येत आहे.याचेच उदाहरण काल अफगाणिस्तानच्या हेरात (Herat) प्रांतात आले आहे लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, तालिबान पोलिसांनी अपहरणाच्या चार आरोपींना गोळ्या घालून ठार केले आणि मृतदेह शहरातील विविध चौकात लटकून ठेवले होते. (Taliban hangs 4 dead bodies in Herat city)

पश्चिम अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील विविध चौकांवर, तालिबान पोलिसांनी चार लोकांना गोळ्या घालून ठार केले, आणि नंतर हे चार मृतदेह क्रेनने रस्त्याच्या मध्यभागी तासन्तास लटकवून ठेवले.या चौघांवर अपहरणाचा आरोप होता.हेरात शहराचे प्रत्यक्षदर्शी वजीर अहमद सिद्दीकी यांनी सांगितले की, चार कथित तालिबानी पोलिसांनी हे चार मृतदेह चौकात आणले आणि त्यातील एका मृतदेहाला क्रेनच्या मदतीने लटकवण्यात आले. हा मृतदेह तासन्तास हवेत लटकलेला राहिला. मृताच्या गळ्यात एक फलकही लटकलेले होते ज्यावर पश्तो भाषेत त्यावर काहीतरी लिहिले होते. उर्वरित तीन मृतदेह तालिबानने हेरातमधील दुसऱ्या चौरस्त्यावर नेऊन लटकावले होते.

हेरातचे डेप्युटी गव्हर्नर मोल्वी शेर अहमद एमार यांनी सांगितले की, तालिबानी लढाऊ अपहरणकर्त्यांचा पाठलाग करत होते आणि त्यादरम्यानच यांच्यामध्ये चकमक झाली आणि सर्व आरोपी ठार झाले. या प्रकारचा गुन्हा पुन्हा घडू नये म्हणून तालिबानने या प्रकारच्या गुन्ह्याची जाहीर शिक्षा केली आहे.

अशा कारवाईबाबत तालिबानचे म्हणणे आहे की चुकीच्या कृत्याबद्दल लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची शिक्षा आवश्यक आहे. तालिबान अशा शिक्षा चालू ठेवेल, जेणेकरून लोक चुकीचे काम करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतील. वजीराने सांगितले की चुकीच्या कामासाठी शिक्षा दिली पाहिजे. पण असा अमानवी मार्ग मानवतेसाठी योग्य नाही. सिद्दीकी म्हणतात, अफगाणिस्तानमध्ये 90 चे दशक पुन्हा एकदा त्या ठिकाणी परतले आहे, जेव्हा लोक तालिबानच्या भीतीने थरथर कापत असत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT