Turkey Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Tajikistan Earthquake: ताजिकिस्तान हादरलं! 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

ताजिकिस्तानमध्ये तब्बल 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला आहे.

दैनिक गोमन्तक

Tajikistan Earthquake: तुर्की-सिरिया झालेल्या भूकंपामुळे मोठी जीवीत आणि वित्तहाणी झाली आहे. ही घटना ताजी असतांना जगभरात भूकंपाचे धक्के बसत असल्याने चिंता वाढली आहे. अशाच एका भूकंपाच्या धक्याने ताजिकिस्तान हादरले आहे. आज सकाळी 4 च्या सुमारास हे धक्के जाणवले आहे. 4.3 रिश्टर स्केल एवढी तीव्रता भूकंपमापकावर नोंदवण्यात आली आहे.

ताजिकिस्तानमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणावले. 4.3 रिश्टर स्केल एवढी तीव्रता या भूकंपाची होती. सुदैवाने या घटनेत जिवीत आणि वित्त हाणी झाल्याची माहिती नाही. ताजिकिस्तानबरोबरच अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के बसले.

भूंकपाचा केंद्रबिंदु ताजिकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ आहे. गेल्या आठवड्यातही ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाच्या काही तासानंतरच चीन-ताजिकिस्तानच्या सीमेजवळ असणाऱ्या झिजियांग प्रांतातही भूकंपाचा धक्का बसला होता.

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे. या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये 50 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 80 हजारांहून अधिक लोक जखमी झाले. हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दोन्ही देशांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT