China-Taiwan Tension Dainik Gomantak
ग्लोबल

China-Taiwan Tension: तैवानने भारताचे मानले आभार, 'आता ड्रॅगनला चोख प्रत्युत्तर देऊ'

China-Taiwan Conflict: तैवानचा चीनसोबतचा तणाव अद्यापही कायम आहे.

दैनिक गोमन्तक

China-Taiwan Tension: तैवानचा चीनसोबतचा तणाव अद्यापही कायम आहे. चीन सातत्याने लष्करी युध्दाअभ्यास करत आहे. ताज्या घडामोडींमुळे भारतही चिंतेत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची 12 ऑगस्ट रोजी म्हणाले, 'भारताने तैवानच्या जलक्षेत्रातील स्थिती बदलण्यासाठी एकतर्फी कारवाई करण्यापासून परावृत्त केले पाहिजे'. त्याच वेळी, प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या प्रतिसादाबद्दल तैवानने भारताचे आभार मानले आहेत. तैवानने रविवारी (14 ऑगस्ट) सांगितले की, 'आम्ही भारतासह सर्व समविचारी देशांशी समन्वय राखून स्वसंरक्षण क्षमता वाढवत आहोत. त्याचबरोबर संयुक्तपणे नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था आणि सुरक्षेचे संरक्षण केले जाईल.'

दरम्यान, तैवानने (Taiwan) म्हटले की, 'आम्हाला जगभरातील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत.' त्यात पुढे म्हटले आहे की, 'अलीकडच्या काळात चीन (China) सातत्याने तैवानला डिवचण्यासाठी लष्करी युध्दाअभ्यास करत आहे. जाणूनबुजून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न चीन करत आहे.'

भारतासह या देशांनी तैवानला पाठिंबा दिला आहे

तैवान सरकार युनायटेड स्टेट्स, जपान (Japan) आणि भारतासह इतर सर्व समविचारी देशांशी संवाद आणि समन्वय राखत आहे. त्याचबरोबर संयुक्तपणे नियम-आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुरक्षिततेचे रक्षण करुन स्व-संरक्षण क्षमता वाढवत राहील.

चीनने तैवानबाबतच्या दाव्याचा पुनरुच्चार केला

या आठवड्याच्या सुरुवातीला, चीनने तैवानवर पुन्हा एकदा दावा केला. त्याचबरोबर चीनने एक श्वेतपत्रिकाही जारी केली आहे. ज्यामध्ये चीनी सरकारने तैवान हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

चीनच्या राज्य माध्यमांनी म्हटले आहे की, श्वेतपत्रिका राष्ट्रीय पुनर्मिलनासाठी देशाचा संकल्प दर्शवते. श्वेतपत्रिकेत म्हटले आहे की, चीनी कम्युनिस्ट पक्ष (CCP) तैवान समस्येचे निराकरण करण्याच्या ऐतिहासिक मिशनसाठी वचनबद्ध आहे.

चीन-तैवान तणाव का वाढला ते जाणून घ्या

यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांनी अलीकडेच तैवानला भेट दिली होती. तेव्हापासून चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंधात तणाव वाढला. चीनने अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच नॅन्सी पेलोसीवरही बंदी घालण्यात आली. अमेरिकन अध्यक्षांच्या भेटीपासून चीन तैवानजवळ सतत लष्करी सराव करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT