Abu Dhabi Airport Dainik Gomantak
ग्लोबल

अबुधाबी विमानतळाजवळ संशयास्पद ड्रोन हल्ला, दोन भारतीयांसह तिघांचा मृत्यू

अबुधाबी विमानतळाजवळ संशयास्पद ड्रोन हल्ल्यात दोन भारतीयांसह तिघांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

संयुक्त अरब अमिराती (UAE) ची राजधानी अबुधाबी मधील प्रमुख तेलसाठा केंद्राजवळ एका संशयित ड्रोन हल्ल्यात पेट्रोलची टाकी उडवण्यात आली, ज्यात दोन भारतीयांसह तीन जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. स्थानिक मीडियाने सोमवारी ही माहिती दिली. WAM या वृत्तसंस्थेनुसार, 'स्फोटामुळे दोन भारतीय नागरिक आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर सहा जणांना हलक्या ते मध्यम जखमा झाल्या आहेत.

हौथीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

राजधानी अबुधाबीमध्ये दोन ठिकाणी आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पहिल्यांदा मुसाफामध्ये आग लागली, तर दुसरी विमानतळावर. ड्रोन हल्ल्यामुळे हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. याह्या सारीशी जोडलेल्या एका ट्विटर खात्याच्या पोस्टनुसार, हौथी संघटनेचे प्रवक्ते, "येत्या काही तासांत संयुक्त अरब अमिरातीमध्ये मोठी लष्करी कारवाई" करण्याची हुथी योजना आखत आहे. सौदी अरेबियापाठोपाठ हौथी बंडखोरांनी यूएईवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

या घटनांचा तपास सुरू करण्यात आला

स्थानिक मीडिया वेबसाइटनुसार, दोन्ही ठिकाणी आग आटोक्यात आणण्यात आली आहे. (FIR incident in Abu Dhabi). त्यामुळे हवाई वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. आगीचे कारण शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरु करण्यात आला आहे. याआधीही हौथींनी सौदी अरेबियावर अनेकदा असे हल्ले केले आहेत. मात्र आता त्याने यूएईला लक्ष्य केले आहे. सौदी अरेबियातील तेल सुविधा आणि अनेक शहरांवर हौथींनी क्षेपणास्त्रे डागली आहेत. येमेन युद्धात सौदी अरेबियाच्या सहभागाचा त्यांना राग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT