Sunao Tsuboi Dainik Gomantak
ग्लोबल

हिरोशिमा अणु हल्ल्यातून वाचलेले सुनाओ त्सुबोई यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन

6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने हिरोशिमा (Hiroshima) शहरावर अणुबॉम्ब टाकला, ज्यात दहा लाखांहून अधिक लोक मरण पावले.

दैनिक गोमन्तक

हिरोशिमा अणुबॉम्ब हल्ल्यातून (Hiroshima atomic bomb attack) वाचलेले आणि अण्वस्त्रांविरुद्ध मोहीम (Nuclear Weapons) राबविणारे सुनाओ त्सुबोई (Sunao Tsuboi) यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले आहे. त्सुबोई यांचा 24 ऑक्टोबर रोजी नैऋत्य जपानमधील (Japan) हिरोशिमा (Hiroshima) येथील रुग्णालयात मृत्यू झाला, असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला, ज्यात दहा लाखांहून अधिक लोक मरण पावले.

अणुबॉम्ब हल्ल्यामुळे सुनाओ त्सुबोईला किरणोत्सर्गाचा त्रास झाला. त्याच्या दुष्परिणामांमुळे त्यांना वर्षानुवर्षे कर्करोग आणि इतर आजारांना सामोरे जावे लागले. त्यांनी आपले बरेच आयुष्य इस्पितळात घालवले, जिथे त्यांच्यावर एनीमियाचा उपचार केला जात होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी हिरोशिमाला ऐतिहासिक भेट दिली तेव्हा त्यांनी त्सुबोई यांची भेट घेतली. हिरोशिमावरील हल्ल्यात 140,000 लोक मरण पावले. या हल्ल्यानंतर, त्सुनाओ त्सुबोई यांनी आपले संपूर्ण आयुष्य अण्वस्त्र नष्ट करण्याच्या मोहिमेसाठी समर्पित केले.

त्सुनाओ त्सुबोई हिरोशिमा हल्ल्यातून कसे वाचले?

6 ऑगस्ट 1945 रोजी दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने हिरोशिमावर अणवस्त्र हल्ला केला होता. यावेळी त्सुबोई 20 वर्षांचे होते आणि हल्ल्यातून चमत्कारिकरित्या बचावले. त्सुबोई कॉलेजला जात असताना हा भयंकर स्फोट झाला. त्यावेळी त्यांचे संपूर्ण शरीर भाजले आणि कानाला मोठी इजा झाली होती. त्यानंतर त्यांनी सुमारे तीन तास कपड्यांशिवाय पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी ते अडखळून जमिनीवर बेशुद्ध पडले. बॉम्बस्फोटानंतर तब्बल 40 दिवसांनी अभियांत्रिकी शिक्षण घेणारे सुबोई शुद्धीवर आले, तोपर्यंत युद्ध संपले होते.

जपानी शाळांमध्ये मुलांना शिकवले

त्सुबोई इतके अशक्त आणि जखमी झाले होते की, शुद्धीवर आल्यानंतर त्यांना जमिनीवर रांगण्याचा सराव सुरु करावा लागला. नंतर सुनाओ त्सुबोई यांनी जपानमधील शाळांमध्ये गणित शिकवले आणि युद्धादरम्यानचे त्यांचे अनुभव मुलांना सांगितले. 'कधीही हार मानू नका' हे सुनाओ त्सुबोईचे ट्रेडमार्क फ्रेज होते. विशेषत: अण्वस्त्र नसलेल्या जगासाठी त्याच्या लढ्यासाठी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT