Sudan Dainik Gomantak
ग्लोबल

सुदानमध्ये तख्तापलट होण्याची शक्यता, मंत्री आणि अधिकारी ताब्यात !

दरम्यान देशात (Sudan) इंटरनेट आणि फोन सिग्नल काम करत नाहीत.

दैनिक गोमन्तक

सुदान लष्कर (Sudanese army) आणि नागरी सरकार (Civil government) यांच्यात चाललेल्या तणावादरम्यान देश बंडखोरीच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. रॉयटर्सच्या मते, सुदान लष्कराने मंत्रिमंडळातील बहुतेक सदस्यांना आणि सरकार समर्थक पक्षाच्या नेत्यांना अटक केली आहे. देशातील मुख्य लोकशाही समर्थक गट सुदान प्रोफेशनल्स असोसिएशनने (Sudan Professionals Association) लष्करी बंडाचा सामना करण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान देशात इंटरनेट आणि फोन सिग्नल काम करत नाहीत.

एका प्रत्यक्षदर्शीने रॉयटर्सला सांगितले की, सुदानच्या लष्करी आणि निमलष्करी दलांनी राजधानी खार्तूममध्ये (Khartoum) नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत. दुबईस्थित अल-अरेबिया टीव्ही चॅनेलच्या मते, खार्तूम विमानतळ (Khartoum Airport) लष्कराने बंद केले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणेही काही कालावधीसाठी बंद केली होती.

सुदानच्या नागरी आणि लष्करी नेत्यांमध्ये तणाव वाढल्यानंतर काही आठवड्यांनंतर मंत्री, अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे सुदानी नागरिक रस्त्यावर उतरत जोरदार लष्करी बंडाळीला विरोध करत आहेत. लष्करांचा सत्तेत येण्याचा प्रयत्न सप्टेंबरमध्ये अयशस्वी झाला होता.

सुदानी अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर पाच सरकारी व्यक्तींच्या अटकेची पुष्टी केली आहे. ताब्यात घेतलेल्या सरकारी सदस्यांमध्ये उद्योग मंत्री इब्राहिम अल-शेख, माहिती मंत्री हमजा बलौल आणि देशाच्या सत्ताधारी संक्रमणकालीन संस्थेचे सदस्य मोहम्मद अल-फिकी सुलेमान आणि पंतप्रधान अब्दुल्लाह हमदोक (Prime Minister Abdullah Hamdok) यांचे मीडिया सल्लागार फैसल मोहम्मद सालेह यांचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

Iran Drone Threat: ऑस्कर 2026 वर इराणच्या ड्रोन हल्ल्याचे सावट, सोहळ्यापूर्वीच एफबीआयचा हाय-अलर्ट; सुरक्षा पथके 'ऑन मोड'

जयशंकर यांचा एक 'कॉल' अन् इराणचा 'ग्रीन सिग्नल'! भारतीय जहाजांसाठी होर्मुजचा मार्ग मोकळा; इराणकडून भारताल विशेष सवलत

SCROLL FOR NEXT