Strongest earthquake of 62 magnitude earthquake in Vanuatu island of South Pacific Ocean 
ग्लोबल

प्रशांत महासागरातील वानुआटु बेटावर पून्हा 6.2 तीव्रतेचा भूकंप

गोमन्तक वृत्तसेवा

वॉशिंग्टन: पॅसिफिक महासागरात नुकत्याच झालेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपानंतर मंगळवारी आणखी एक तीव्र भूकंपाचा झटका जाणवला. दक्षिण प्रशांत महासागरातील वानुआटु बेटावर 6.2 तीव्रतेचा हादरा बसला आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (यूएससीएस) ने ही माहिती दिली आहे. भूकंपात कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच त्सुनामीच्या धोक्याची कोणतीही बातमी मिळाली नाही. प्रशांत महासागराच्या भूकंपाचे केंद्रबिंदू वानुआटुचा शेफा प्रांत असल्याचे म्हटले जाते.

यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंप जमीनीपासून 14 किलोमीटर खाली जाणवला आहे. भूकंपाच्या तीव्रतेबद्दल अजूनही काही शंका व्यक्त केली जात आहेत. असे मानले जाते की इतर एजन्सीशी सोबत केलेल्या बातचिती नंतर यामध्ये संशोधन केले जाऊ शकते.

मंगळवारी सकाळी सातच्या वाजताच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले ज्यांची तीव्रता 5.1 नोंदविली जात आहे. हा भूकंप जमिनीपासून 16 किलोमीटर खाली झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे जीवितहानीचे कोणतेही नुकसान झाले नाही. मागील आठवड्यात दक्षिण प्रशांत महासागरात 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामुळे एक लहान त्सुनामीही तयार झाली होती. भूकंप इतका जोरदार होता की त्याचे झटके न्यूझीलंडमध्येही जाणवले होते.

माध्यमांच्या माहितीनुसार वानुआटुलामध्ये बर्‍याच काळानंतर इतका जोरदार धक्का बसला आहे. “गेल्या काही वर्षांत असा तीव्र धक्का कधीच बसला नव्हता. अजूनही माझा जीव या धक्क्यात आहे. खूप मोठा भूकंप,” असे ट्विट तेथिल स्थानिक पत्रकार डैन मैक्गेरी यांनी  केले आहे. चांगली गोष्ट म्हणजे या भूकंपामुळे किनारपट्टीच्या देशात त्सुनामीचा धोका निर्माण झाला नाही. याआधीही दोन तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र, 5..5 आणि 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT