Sri Lanka  Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: श्रीलंकेचे राष्ट्रपती 13 जुलैला देणार राजीनामा?

स्पीकरच्या घरी बोलावलेल्या बैठकीत देशाच्या अंतरिम राष्ट्रपतीसाठी स्पीकर महिंदा यापा अबेवर्देना यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Sri Lanka Crisis: राजधानी कोलंबोमध्ये झालेल्या निदर्शनानंतर, स्पीकरच्या घरी बोलावलेल्या बैठकीत देशाच्या अंतरिम राष्ट्रपतीसाठी स्पीकर महिंदा यापा अबेवर्देना यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी 9 जुलै रोजी झालेल्या निदर्शनात आंदोलक राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. यातच आता श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे 13 जुलै रोजी राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सभापतींनी बैठक बोलावली होती

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतर शनिवारी आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. यानंतर तणाव निर्माण झाल्यानंतर सभापती महिंदा यापा आबेवर्धने यांनी सायंकाळी चार वाजता त्यांच्या घरी पक्षश्रेष्ठींची विशेष बैठक बोलावली होती. यापूर्वी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी देखील पक्षाच्या नेत्यांना स्पीकरच्या घरी तातडीच्या बैठकीसाठी बोलावले होते.

दुसरीकडे, देशातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती, जेणेकरुन समस्या लवकर निकाली काढता येईल. यामध्ये खासदारांच्या एका गटाने राष्ट्रपती राजपक्षे यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात, श्रीलंकेच्या पोदुजाना पेरामुना (SLPP) च्या 16 खासदारांनी त्यांना भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपांपासून दूर असलेल्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याला देशाच्या राष्ट्रपतीपदाची संधी देण्याचे पत्र लिहिले आहे.

सभापतींचे नाव मान्य केले

वृत्तानुसार, श्रीलंकेच्या (Sri Lanka) सभापतींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत स्पीकरला अंतरिम अध्यक्ष बनवण्यावर सहमती झाली आहे. त्यामुळे देशात सर्वपक्षीय सरकार (Government) स्थापनेचा मार्गही मोकळा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'रिक्षाच्या पुढून धावली अन् थेट...' चिमुरडीचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिला का?

Goa Cooperative Societies: सहकारी सोसायट्यांमधील ठेवींत 454 कोटींनी वाढ; थकीत कर्ज 258 कोटींनी वाढले, सरकारी अहवालातील निष्कर्ष

VIDEO: ट्रेकिंगचा आनंद अन् मृत्यूशी गाठ! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक; पर्यटकांची पळापळ, थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Bicholim Heavy Rain: डिचोलीत आठवडी बाजार थंडावला; पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी झाडांची पडझड

Lucky Zodiac Sign: बँक बॅलन्समध्ये होणार दणदणीत वाढ! 'या' 3 राशींसाठी ग्रहांची चाल ठरणार 'गेमचेंजर'; एका झटक्यात मिटणार गरिबी

SCROLL FOR NEXT