Spain  Dainik Gomantak
ग्लोबल

Menstrual leave: 'या' देशाने महिलांसाठी घेतला मोठा निर्णय, मासिक पाळीच्या काळात मिळणार हक्काची सुट्टी

स्पेनच्या संसदेने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Spain Approves Menstrual leave: स्पेनच्या संसदेने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. स्पेनमधील महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी घेता येणार आहे.असा निर्णय घेणारा हा पहिला युरोपियन देश ठरला आहे.

या या काळात महिलांना पगारी रजा मंजूर करण्यात येणार आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देणाऱ्या काही देशांपैकी आता स्पेन हा एक बनला आहे.

जपान, इंडोनेशिया आणि झांबिया या देशात मिळते महिलांना सुट्टी

स्पेनमध्ये करण्यात आलेल्या या कायद्याला संसदेत एकूण 185 मतांपैकी 154 मते मिळाली आहेत. बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती सरकारने केली आहे.

सध्या काही निवडक देशांमध्ये महिलांना (Women) मासिक पाळीच्या काळात सुट्टी दिली जाते. सुट्टी देणाऱ्या देशांमध्ये जपान, इंडोनेशिया आणि झांबिया या देशांचा समावेश आहे.

  • महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक निर्णय

महिलांच्या आरोग्यांच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचे मंत्री इरेन मोंटेरो यांनी म्हटले आहे. या कायद्याने महिलांना मासिक पाळीत पगारी रजा देण्याचा अधिकार दिला असल्याचे मंत्री इरेन मोंटेरो यांनी म्हटले आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना आजारी रजा लागू करण्याचा अधिकार असणार आहे.

  • UGT कामगार संघटनेचा विरोध

स्पॅनिश सोसायटी ऑफ गायनॅकॉलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्सच्या मते, मासिक पाळीमध्ये सुमारे एक तृतीयांश महिलांना तीव्र वेदना होतात. दरम्यान, मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देण्याच्या निर्णयाला काही संघटनांनी विरोध देखील केला आहे.

UGT या स्पेनच्या सर्वात मोठ्या कामगार संघटनेने या कायद्याला विरोध केला आहे. हा कायदा कामाच्या ठिकाणी महिलांना कलंकित करू शकतो असं या संघटनेने म्हटले आहे. मासिक पाळीदरम्यान महिन्याच्या त्या चार पाच दिवसांमध्ये महिलांना तीव्र वेदना सहन कराव्या लागतात.

अनेकदा या वेदनांमुळे त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होतो. मासिक पाळीतील होणाऱ्या वेदनांमुळे महिलांना मासिक पाळीची सुट्टी देण्याचा निर्णय स्पेनने घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT