Space Travel  Dainik Gomantak
ग्लोबल

जपानी उद्योजक युसाकू माएझावा 12 दिवसांच्या 'अंतराळ' दौऱ्यावर

जपानी उद्योजक युसाकू माएझावा यांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दौऱ्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

जपानी उद्योजक युसाकू माएझावा यांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दौऱ्याच्या प्रवासाला (Space Travel) सुरुवात केली आहे. यामुळे ते अंतराळात (Space) पोहोचलेल्या अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत.

कझाकस्तान मधून उड्डाण केलेल्या रशियन (Russia) रॉकेट त्यांना अंतराळात घेऊन जाणार आहे. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) 12 दिवस वास्तव्य करतील. अलिकडच्या वर्षांत स्टेशनला भेट देणारे ते पहिलेच अंतराळ पर्यटक (Tourist) ठरणार आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना मेझावा म्हणाले की, "ही सहल स्वप्न सत्यात उतरवणारी असेल. त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असताना 100 कार्ये करण्याचे वचन दिले आहे, जे जनतेने योगदान दिलेल्या सूचनांच्या यादीतून काढले आहेत.

अब्जाधीश जेफ बेझोस व रिचर्ड ब्रॅन्सन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला अवकाशाच्या काठावरचा प्रवास केला होता. त्यांना मागे टाकत माएझावा थेट अंतराळ स्थानकालाच भेट देणार आहेत. अवकाशात भ्रमंती करण्यासाठी त्यांना 88 मिलियन डॉलर इतकी किंमत मोजावी लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT