Solar Storm News, Heat Wave News  Dainik Gomantak
ग्लोबल

Solar Storm: सौर वादळामुळे उपग्रह सेवांना फटका, नासाचा इशारा

सूर्याच्या पृष्ठभागावर निर्माण झालेले सौर वादळ वेगाने पृथ्वीकडे सरकत असल्याने त्याचा परिणाम उपग्रहांवर होणार असल्याची माहिती नासाने दिली आहे.

दैनिक गोमन्तक

सूर्याच्या पृष्ठभागावर निर्माण झालेलं सौर वादळ (Solar Storm) वेगाने पृथ्वीकडे येत असल्याची माहिती नासाने दिली आहे. या वादळाचा वेग पाहून 'नासा'च्या (NASA) शास्त्रज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सूर्यापासून निघालेल्या या ज्वाळेचा वेग ताशी 10 लाख मैल किंवा 160000 किलोमीटर वेगानं अंतराळात प्रवास करत आहेत. येत्या काही दिवसांत हे कण पृथ्वीच्या वातावरणाला धडकण्याची शक्यता दर्शवली आहे. याचा परिणाम पृथ्वीच्या दक्षिण भागात दिसून येऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. (Solar Storm News)

या आठवड्याच्या शेवटी सौर वादळामुळे काही तुकडे पृथ्वीवर धडकण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी दर्शवली आहे. वादळाच्या या ज्वाळांच्या लाटा पृथ्वीवर धडकल्यानंतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. सूर्याच्या (Sun) पृष्ठभागावर किरणोत्सर्गाच्या शक्तिशाली स्फोटांमुळे निर्माण झालेल्या या सौरज्वाळा तात्पुरत्या काळासाठी संचार आणि नेव्हिगेशन ब्लॅकआउटसाठी कारणीभूत ठरून जगातील अनेक ठिकाणी वीज प्रवाह बंद होण्याची शक्यता आहे. "आमच्या सौर वेधशाळांचे नेटवर्क आम्हाला अवकाशातील हवामानातील होणाऱ्या घडामोडीचा मागोवा घेण्यास मदत करते, ही समाधानाची बाब आहे', असं म्हणत नासाने (NASA) दिलासा दिला आहे.

* सौर वादळाचे काय परिणाम होऊ शकतात

सौर वादळ हे धोकादायक असू शकते. सौर वादळांमुळे पृथ्वीवरील वातावरणात अधिक वाढ होऊ शकते. याचा थेट परिणाम उपग्रहांवर होऊ शकतो. यामुळे जीपीएस नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्हीमध्ये अडथळा येऊ शकतो. वीज प्रवाहीत करणाऱ्या तारांमध्ये करंट तीव्र झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT