Second Hand Smartphone Dainik Gomantak
ग्लोबल

Smartphone: स्मार्टफोन यूजर्ससाठी धक्कादायक बातमी, 'या' सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चोरुन ऐकलं जातयं तुमचं बोलणं!

आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात सर्व काही शक्य आहे. मानवाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर खूप प्रगती केली आणि अजूनही करत आहे.

Manish Jadhav

आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात सर्व काही शक्य आहे. मानवाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर खूप प्रगती केली आणि अजूनही करत आहे. मोबाईल हे तंत्र तर आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की, तुमचा मोबाईल तुमचं संभाषण चोरुन ऐकतोय? असा सवाल विचारण्याचा कारणही तसचं आहे. एक मोठा खुलासा झाला आहे. ज्या मोबाईलशिवाय तुम्ही एक क्षणभरही राहू शकत नाही तोच मोबाईल तुमची संभाषणे चोरुन ऐकतोय.

तुमच्या बाबतीत असे कधी घडले आहे का की, एखादी वस्तू खरेदी करण्याबाबत तुम्ही तुमच्या मित्राशी चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्याच उत्पादनाशी संबंधित जाहिरात दिसू लागली? जर होय असेल तर तुमचा मोबाईल तुमची संभाषणे चोरुन ऐकतो यावर तुमचा विश्वास नक्की बसेल. 404 मीडियाच्या अलीकडील रिपोर्टमध्ये मोबाईल ॲक्टिव्ह लिसनिंग सॉफ्टवेअरने संभाषणे लोड होत असल्याचे समोर आले आहे. हे एक तंत्रज्ञान आहे जे मोबाईलला त्याच्या मायक्रोफोनद्वारे संभाषणे शोधून देते आणि वापरकर्त्यांकडून रिअल टाइममध्ये डेटा संकलित करु देते.

Google आणि Meta सारखे क्लायंट असलेल्या मार्केटिंग कंपन्यांद्वारे अशाप्रकारचे सॉफ्टवेअर वापरले जाते. ग्राहकापर्यंत त्याच्या आवडीच्या उत्पादनाविषयीची जाहिराती पाठवण्यासाठी स्टोअर केलेल्या डेटाचा वापर केला जाऊ शकतो.

404 रिपोर्टनुसार, कॉक्स मीडिया ग्रुपचा आघाडीचा मीडिया प्लेयर संभाषणांचा मागोवा घेण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी AI अधिकृत मीडिया प्लेअर सॉफ्टवेअर अॅक्टिव्ह करते. हे सॉफ्टवेअर 470 हून अधिक स्त्रोतांकडून डेटा संकलित करते आणि ते पुढे वापरकर्त्यांच्या ऑनलाईन अॅक्टिव्हीटीनुसार व्हॉइस डेटाशी लिंक करते आणि त्यावरुन एक मजबूत प्रोफाइल तयार करते. अशी प्रोफाइल्स जाहिरातदारांना वापरकर्त्यांना टार्गेट करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ, एखाद्याने कॉफी मशीन खरेदी करण्याबद्दल बोलल्यास, सॉफ्टवेअर नंतर त्या संभाषणातून प्रश्नात असलेल्या मशीनची पॉप-अप जाहिरात सूचित करु शकते.

दरम्यान, या मोठ्या खुलाशावर आता बड्य-बड्या टेक दिग्गजांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मार्केटिंग कंपनीद्वारे वापरकर्त्याचा डेटा अयोग्यरित्या स्टोअर केला गेला नाही याची खात्री करण्यासाठी Meta ने याविषयी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

दुसरीकडे, ॲमेझॉनने या खुलशापासून फारकत घेतलेली नाहीये. आपण अशाप्रकारचे कोणतेही काम करत नसल्याचा दावा ॲमेझॉनकडून करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आले की, ते यापुढे मार्केटिंग फर्मसोबत काम करणार नाहीत. एवढेच नाहीतर ॲमेझॉनने जे त्याचे पार्टनर वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन करताना आढळतील त्यांच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल असेही सांगितले आहे.

जगभरातील सरकारे टेक कंपन्यांकडून डेटा कसा वापरला जात आहे यावर ताशेरे ओढत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: 13 वर्षीय वैभवसाठी राजस्थानने मोजले 1.1 कोटी

St. Francis Xavier Exposition: गोयचो सायब पावलो!! शव प्रदर्शन सोहळ्याला 170 पाकिस्तानी गोव्यात येणार; व्हिसा मंजूर झाल्याने मार्ग मोकळा

Quepem Crime: पारोडातील महिलेच्या हत्येचे गूढ उकलले,सहा दिवसांनी संशयिताला मध्य प्रदेशातून अटक

गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

Goa BJP: महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! सावंत, राणेंचा प्रचार ठरला लाभदायी

SCROLL FOR NEXT