Singapore Train Video Dainik Gomantak
ग्लोबल

Singapore Train Video: खरंच की काय! घरासमोर येताचं ट्रेनच्या खिडक्या होतात आपोआप बंद; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल

या सिंगापूर ट्रेन्सचा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

दैनिक गोमन्तक

Singapore Train Video: सोशल मीडियावर एक अतिशय आश्चर्य करणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. सिंगापूर ट्रेनचा व्हिडिओ लोकांना आकर्षित करत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सिंगापूर ट्रेन लोकांच्या घरातून जाताच त्याच्या खिडक्या आपोआप बंद होतात. मिळालेल्या माहितीनुसार लोकांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. ट्रेनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

लँड ट्रान्सपोर्ट अथॉरिटी सिंगापूर सरकारच्या एजन्सीच्या वेबसाइटनुसार, ही ट्रेन सिंगापूरची बुकित पंजांग लाइट रेल ट्रान्झिट आहे.

  • घराजवळ जाताच बंद होतात ट्रेनच्या खिडक्या

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये (Video) असे दिसून येते की, रेल्वे निवासी इमारतींजवळून जाताच त्याच्या खिडक्या अपारदर्शक होतात. शहरी जीवन सुसह्य करण्याचा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे. व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील वापरकर्ते ट्रेनमधील नवीन फीचरचे कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ फॅसिनेटिंग फुटेजने ट्विटरवर शेअर केला आहे.

सिंगापूर ट्रेनचे खास फिचर

लँड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीनुसार ही ट्रेन सिंगापूरची बुकित पंजांग लाइट रेल ट्रान्झिट (LRT) आहे. याला सिंगापूरची पहिली लाईट रेल असेही म्हणतात. SGTrains वेबसाइटने म्हटले आहे की, "या ट्रेन्सच्या स्मार्ट मिस्टिंग काचेच्या खिडक्या ऑटोमॅटिक आहेत. या ट्रेन्स एका विशेष एलिव्हेटेड गाईडवेवर धावतात. हे वैशिष्ट्य LRT लाईनजवळ राहणाऱ्या रहिवाशांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे." जोडण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT