Sheikh Hasina  Dainik Gomantak
ग्लोबल

Bangladesh Violence: 'पुरावा नसताना हिंदू तरुणाचा बळी घेतला', दीपू दासच्या हत्येवर शेख हसीनांचा संताप; बांगलादेशातील कट्टरपंथीयांवर साधला निशाणा

Sheikh Hasina Reaction On Dipu Das Murder: बांगलादेशातील मैमनसिंह शहरात दीपू दास या 25 वर्षीय हिंदू तरुणाची ज्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

Manish Jadhav

Sheikh Hasina Reaction On Dipu Das Murder: बांगलादेशातील मैमनसिंह शहरात दीपू दास या 25 वर्षीय हिंदू तरुणाची ज्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली, त्याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले आहेत. या घटनेमुळे भारतात ठिकठिकाणी निदर्शने होत असतानाच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी एक धक्कादायक ऑडिओ बाइट जारी केला. या संदेशात त्यांनी दीपू दासच्या हत्येचा तीव्र निषेध केला असून ही हत्या म्हणजे अमानवीयतेचा कळस असल्याचे म्हटले.

'पुरावा काहीच नव्हता, फक्त खोटे आरोप'

शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी आपल्या ऑडिओ संदेशात स्पष्टपणे सांगितले की, दीपू दासवर लावण्यात आलेले ईशनिंदेचे आरोप पूर्णपणे खोटे होते. "दीपूने प्रेषितांचा अपमान केला, याचा कोणताही पुरावा कोणाकडेही नव्हता. केवळ अफवा पसरवून एका निष्पाप तरुणाचा बळी घेण्यात आला," अशा शब्दांत त्यांनी कट्टरपंथीयांवर हल्ला चढवला. "ज्या पद्धतीने त्याची हत्या करुन मृतदेह जाळण्यात आला, ते पाहून मन सुन्न होते. हे क्रूर लोक कुठून आले आहेत?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

'ज्यांना मोठं केलं, त्यांनीच हे केलं का?'

शेख हसीना यांनी आपल्या संदेशात अत्यंत भावनिक आणि राजकीय प्रश्न उपस्थित केला. त्यांनी विचारले की, "हे तेच लोक आहेत का, ज्यांना आम्ही खाऊ-पिऊ घातले, ज्यांना आम्ही शिक्षण दिले आणि मोठे केले? आज हीच माणसे इतकी क्रूर कशी झाली की एका निष्पाप माणसाला झाडाला लटकवून जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली?" हा संदेश त्यांनी बांगलादेशातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीवर आणि कट्टरपंथीयांच्या वाढत्या वर्चस्वावर बोट ठेवण्यासाठी दिला असल्याचे मानले जात आहे.

कुटुंबीयांना दिलासा आणि न्यायाचा शब्द

दीपू दासच्या शोकाकुल कुटुंबाबाबत संवेदना व्यक्त करताना हसीना यांनी त्यांना धीर धरण्याचे आवाहन केले. "जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत दीपूच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करत राहीन. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही," असे आश्वासन त्यांनी दिले. शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला असल्या तरी, बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील अत्याचारावर त्यांनी पहिल्यांदाच इतकी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सनातनी एकवटले

दुसरीकडे, दीपू दासच्या हत्येच्या निषेधार्थ भारतात (India) संतापाची लाट आहे. दिल्ली, कोलकाता, भोपाळ आणि मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली आहेत. "बांगलादेशातील हिंदू असुरक्षित आहेत," अशी घोषणाबाजी करत सनातनी समाज एकत्र आला आहे. बांगलादेश हाय कमिशनवर मोर्चे काढून आंतरराष्ट्रीय समुदायाने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फॅशन शोमध्ये टाळ्यांचा कडकडाट थांबला अन् अचानक किंकाळी घुमली, पुढं काय झालं ते तुम्हीच बघा? मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल

मैदानावर 'फ्लॉप', रिसॉर्टमध्ये 'टॉप'; नऊपैकी सहा दिवस मद्यधुंद अवस्थेत होते इंग्लिश खेळाडू, मॅनेजरच्या खुलाशानं क्रिकेट जगतात खळबळ

मोपा विमानतळावर टॅक्सी चालकांचा एल्गार! 210 रुपये 'पिक-अप' शुल्कावरून राडा; प्रवाशांचे अतोनात हाल

Arpora Nightclub Fire: 'बर्च' मधील मृत कामगारांना मिळाली नाही नुकसान भरपाई, 'मानवाधिकार'कडून कामगार आयुक्तांना नोटीस

Goa Politics: "हे भाजपच्या राजकीय अध:पतनाचे लक्षण" विजय सरदेसाईंचा इशारा; 'नारळ' फोडून जल्लोष करणं पडणार महागात?

SCROLL FOR NEXT