Severe earthquake in America Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेत तीव्र भूकंप!

अमेरिकेच्या(America Earthquake) यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) ने सांगितले आहे

दैनिक गोमन्तक

अमेरिकेच्या(America) अलास्का(Alaska) द्वीपकल्पातभूकंपाचे(Earthquake) तीव्र तीव्र धक्के जाणवले आहेत . रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 8.2 नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्रबिंदू अलास्कामधील(America Earthquake) पेरीविले येथून पूर्व-दक्षिणपूर्व 91किमी अंतरावर असल्याचे समजत आहे. भूकंप इतका जोरदार होता की यानंतर दक्षिण अलास्का, हवाई आणि अलास्का द्वीपकल्पात त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला असून लोकांना किनाऱ्यापासून दूर व सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे.(Severe earthquake in America)

अमेरिकेच्या यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) ने सांगितले आहे , भूकंप रात्री 10-15 वाजता 35 किमीच्या खोलीवर झाला असल्याचे समोर येत आहे.

अलास्कामधील राष्ट्रीय त्सुनामी चेतावणी केंद्रानेदक्षिणेकडील भाग, द्वीपकल्प आणि प्रशांत कोस्ट हिनचिन्ब्रुक प्रवेशद्वार ते युनिमक खिंड या सगळ्या भागांना त्सुनामीचा इशारा दिला आहे तसेच एनटीडब्ल्यूसीने म्हटले आहे की ते इतर यूएस आणि कॅनेडियन पॅसिफिक किनारपट्टीच्या भागांसाठी त्सुनामीची शक्यता आहे का हे तपासून पाहत आहेत.

यापूर्वीही अमेरिकेत, 31 मे रोजी पर्वतीय प्रदेशात 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यावेळेसही होमर ते फेअरबॅक्सपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले होते . अँकरॉरेज आणि वासिल्ला भागात हे भूकंप खूप जोरदार होते. अलास्काच्या या भागात मे महिन्यात झालेल्या भूकंपामुळे जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नव्हते पण त्याची तीव्रता खूप जास्ती जाणवली होती.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलास्कामध्ये बर्‍याचदा भूकंपाचे झटके येतात. अलास्का पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा एक भाग आहे, जो भूकंपाच्या गतिविधीमध्ये खूप सक्रिय मानला जातो. मार्च 1964 मध्ये उत्तर अमेरिकेचा सर्वात विनाशकारी भूकंप नोंदविला गेला होता .ज्याची तीव्रता 9.2 होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT