Seema Haider-Sachin Love Story Dainik Gomantak
ग्लोबल

Seema Haider : 'मला पाकिस्तानात पाठवू नका, मला मारून टाकतील, मी हिंदू झाली आहे…',प्रियकरासाठी भारतात आलेल्या तरुणीचे योगींना साकडे

PUBG गेम खेळताना मैत्री, नंतर प्रेम आणि आता पाकिस्तान सोडून ग्रेटर नोएडाला आलेल्या सीमा हैदर एका मागून एक खुलासे करत आहे.

Ashutosh Masgaunde

Seema Haider-Sachin Love Story: सचिनच्या प्रेमापायी नेपाळमार्गे पाकिस्तानातून ग्रेटर नोएडा येथे पोहोचलेल्या सीमा हैदरच्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. सीमाला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. आता तीची जामिनावर सुटका झाली आहे.

सुटका झाल्यानंतर सीमाने सांगितले की तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे. ती नेपाळमध्ये हिंदू झाली. यानंतर सचिनशी हिंदू रितीरिवाजाने लग्न केले. गंगेत स्नान करून, ती शाश्वत श्रद्धांचे पालन करण्याबद्दल आश्वासन देत आहे.

सीमा म्हणाली की जर तीला पाकिस्तानात परत पाठवले तर, तीला ठार मारले जाईल. त्यांच्या प्रेमाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

गदर चित्रपटातील 'घर आजा परदेसी' या गाण्यावरील तिचा रील सध्या व्हायरल होत आहे.

जामिनावर सुटल्यानंतर सीमाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे हात जोडून विनंती केली की, तिला सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी द्यावी. पाकिस्तानात पाठवू नये.

पाकीस्तानी प्रेयसी सीमा हैदरच्या चारही मुलांचा प्रियकर सचिन मीनाने स्वीकार केला आहे.

पूजा-पाठही सुरू केला

सीमा हैदर म्हणाली की, तीने हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर पूजा-पाठ करायलाही सुरूवात केली आहे. जामिनावर सुटल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. सचिनसोबतच आयुष्य घालवण्याची ईच्छा ती बोलून दाखवत आहे.

नेपाळमध्ये हिंदू रितीरिवाजांनी लग्न केल्याचे सीमा सांगते. मी पूजाही सुरू केली आहे. आता मी गंगेत स्नान करून सनातनची श्रद्धा पूर्ण करेन. ती म्हणते की मला आता पाकिस्तानात जायचे नाही. मला तिथे मारले जाऊ शकते.

सचिनशी नेपाळमध्ये लग्न

सीमाने नेपाळमधील पशुपती नाथ मंदिरात सचिन लग्न केले. सचिनने सीमा आणि तिच्या चार मुलांना स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

या लग्नानंतर सीमा गुलाम हैदर ग्रेटर नोएडातील रबुपुरा येथे आली. मात्र, त्याच दरम्यान त्यांचे प्रकरण समोर आले. नुकतेच पोलिसांनी त्याला अटक केली.

सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा पोलिसांना संशय होता. अशा स्थितीत संपूर्ण तपास करण्यात आला. आतापर्यंतच्या तपासात तिच्याबद्दल काहीही संशयास्पद आढळले नाही.

सचिनच्या कुटुंबीयांनीही सीमासह चार मुलांना स्वीकारले

सीमा हैदर आणि तिच्या मुलांनाही सचिन मीनाच्या कुटुंबीयांनी स्वीकारलं आहे. जामीन मिळाल्यानंतर घरी परतलेल्या महिलेला सचिनच्या कुटुंबीयांनी मुलगी असल्याचे गृहीत धरून दाखल केले. तिथे ती आता आपल्या चार मुलांसह सचिनसोबत राहत आहे.

कारागृहातून परतलेल्या सीमाने भारत सरकार आणि नोएडा पोलिसांचे कौतुक केले. पोलिसांच्या चौकशीत आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नसल्याचे तिने सांगितले.

देश न सोडण्याच्या अटीवर जामीन

न्यायालयाने सीमा हैदर, सचिन मीना आणि त्याच्या वडिलांना जामीन मंजूर केला. सीमा हैदर यांना देश न सोडण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

तिला सचिनसोबत राबुपुरा येथे राहायचे आहे, असे सीमा सांगते. ग्रेटर नोएडामध्येच स्थायिक होण्याचा त्यांचा मानस आहे. तिला कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात परत जायचे नाही.

PUBG गेम खेळताना सीमा सचिनच्या प्रेमात पडली. यानंतर ती नेपाळमार्गे पाकिस्तानातील कराचीहून ग्रेटर नोएडाला पोहोचली. सीमाला जामीन मिळाल्यानंतर तिची मुलेही खूश दिसत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT