Scientist Stephen Hawking Dainik Gomantak
ग्लोबल

शास्त्रज्ञ Stephen Hawking यांनी डॉक्टरांचा अंदाज ठरवला होता खोटा

हे विश्व कोणीही निर्माण केले नाही. ही नैसर्गिक देण आहे. आणि मनुष्य निसर्ग निर्मित प्राणी आह, असे ठाम मत महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे होते.

दैनिक गोमन्तक

महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग (Stephen Hawking's Birthday) यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 8 जानेवारी 1942 रोजी ऑक्सफर्ड (Oxford), युनायटेड किंगडम (United Kingdom) येथे झाला होता. स्टीफन हॉकिंग ही अशी व्यक्ती होती ज्याने डॉक्टरांचे भाकीत खोटे ठरवले होते. एवढेच नाही तर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनीच देव नाही असेही म्हटले होते. आपलं नशीब कोणी लिहीत नाही असे त्यांचे ठाम मत होते कारण स्टीफन हॉकिंग हे नास्तिक होते.

स्टीफन हॉकिंगबद्दल डॉक्टरांनी केली होती भविष्यवाणी

शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग (Scientist Stephen Hawking) यांना अॅमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (Amyotrophic Lateral Sclerosis) (ALS) आजार होता. स्टीफन हॉकिंग वयाच्या 21 व्या वर्षी या धोकादायक आजाराच्या विळख्यात आले. एएलएस आजारात माणसाची मज्जासंस्था हळूहळू काम करणे बंद करते. मग हळूहळू संपूर्ण शरीराची हालचाल थांबते. स्टीफन हॉकिंग जेव्हा उपचारासाठी रुग्णालयात गेले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की ते फक्त जास्तीत जास्त दोन वर्ष जगू शकतील.

स्टीफन हॉकिंग यांनी डॉक्टरांचा दावा खोटा असल्याचे सिद्ध केले

आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर स्टीफन हॉकिंग यांनी डॉक्टरांचा अंदाज खोटा ठरवला. त्यावेळी स्टीफन हॉकिंग यांच्या मेंदूशिवाय शरीराचा कोणताही भाग काम करत नव्हता. असे असूनही स्टीफन हॉकिंग यांनी हार मानली नाही आणि ते जगातील महान शास्त्रज्ञ बनले.

स्टीफन हॉकिंग यांचे महत्त्वाचे संशोधन

शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी अवकाश विज्ञान क्षेत्रात मोठे योगदान दिले. सिंग्युलॅरिटीचा सिद्धांत, कृष्णविवरांचा सिद्धांत, कॉस्मिक इन्फ्लेशन थिअरी, ब्रह्मांडाचे वेव्ह फंक्शन मॉडेल आणि टॉप-डाउन थिअरी हे रिसर्च त्यांनी केले आहे.

त्यांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांचे भाकीत चुकीचे सिद्ध करण्याबरोबरच शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले होते, 21 व्या शतकाच्या अखेरीस आपण देवाचे मनही जाणून घेण्यास सुरुवात करू. हे विश्व कोणीही निर्माण केले नाही. ही नैसर्गिक देण आहे. आणि आपण निसर्गाची निर्मीती आहोत, असे ठाम मत महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT