Saudi Arabia Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arabia: सौदी अरेबियाने महिलांना दिला आणखी एक हक्क, पुरुष जोडीदाराशिवायही...

Saudi Arabia New Law For Women: सौदी अरेबिया हा एक मुस्लिम देश आहे.

दैनिक गोमन्तक

Saudi Arabia New Law For Women: सौदी अरेबिया हा एक मुस्लिम देश आहे, परंतु गेल्या एका दशकात या देशाने अनेक कठोर नियमांना तिलांजली देण्याचा प्रयत्न केला आहे. हा देश कट्टरतावाद सोडून प्रत्येक धर्म, प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार देण्यासाठी काम करत आहे. महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्याबाबतही इथे बरेच काम केले जात आहे. यातच सौदी अरेबिया सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे.

अहवालानुसार, आता महिलांना 'मेहरम' किंवा पुरुष साथीदाराशिवाय हज किंवा उमराह करण्याची परवानगी असेल. सौदीची राजधानी रियाधने (Riyadh) सोमवारी याची घोषणा केली आणि हा नियम प्रत्येक देशातील महिलांना लागू होईल, असे सांगितले. आतापर्यंत महिला आणि मुलांना फक्त 'मेहरम' नेच हजला जाण्याची परवानगी होती. मेहराम हा पुरुष साथीदार आहे, जो संपूर्ण हज दरम्यान महिलेसोबत राहतो.

सौदी अरेबियाच्या मंत्र्याने नवीन नियमाची पुष्टी केली

पूर्वी 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना (Women) मेहरामशिवाय हज करण्याची परवानगी होती, परंतु तो अपवाद होता. ही परवानगी प्रत्येक महिलेसाठी नव्हती. सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री तौफिक अल राबिया म्हणाले की, "महिला आता मेहरामशिवाय उमराह करण्यासाठी देशात येऊ शकतात." या आदेशामुळे सौदी अरेबियाची (Saudi Arabia) अनेक दशके जुनी प्रथा संपुष्टात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT