Execution Dainik Gomantak
ग्लोबल

दहशवादाविरोधात सौदी अरेबिया आक्रमक, एका दिवसात 81 जणांना दिली फाशी

सौदी अरेबियाने (Saudi Arabia) एका दिवसात दहशतवादी गुन्ह्यांसाठी 81 जणांना फाशी दिली आहे. राज्य माध्यमांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

सौदी अरेबियाने एका दिवसात दहशतवादी गुन्ह्यांसाठी 81 जणांना फाशी दिली आहे. राज्य माध्यमांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. दहशतवादाशी संबंधित विविध गुन्ह्यांसाठी एका दिवसात 81 जणांना फाशी देण्यात आल्याचे सौदी अरेबियाने (Saudi Arabia) शनिवारी सांगितले आहे. हा आकडा 2021 मध्ये देशातील एकूण फाशीच्या संख्येपेक्षा जास्त आहे. (Saudi Arabia has executed 81 people in a single day for terrorism)

दरम्यान, अधिकृत सौदी प्रेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार, दोषी ठरलेले हे इस्लामिक स्टेट (Islamic State), अल-कायदा, हुथी आणि इतर दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. ते महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याचा आणि शस्त्रास्त्रांची देशात तस्करी करण्याचा कट रचत होते.

81 पैकी 73 सौदी नागरिक

सौदी प्रेस एजन्सी (SPA) नुसार, मृत्युदंड देण्यात आलेल्या 81 लोकांपैकी 73 सौदी नागरिक होते. यात 7 येमेनी आणि एक सीरियन नागरिक आहे. एसपीएच्या म्हणण्यानुसार, ते प्रमुख आर्थिक केंद्रांवर हल्ले करण्याचा कट रचत होते. त्यांच्यापैकी काहींनी सुरक्षा दलाच्या सदस्यांची हत्या केली होती किंवा ते देशात शस्त्रास्त्रांच्या तस्करीत गुंतले होते.

न्यायालयीन सुनावणीनंतर फाशी देण्यात आली

ज्यांना फाशी देण्यात आली त्यांच्यावर सौदी अरेबियाच्या न्यायालयात खटला चालवला गेला. एसपीएनुसार, प्रत्येक दोषीच्या खटल्यांची सुनावणी 13 न्यायाधीशांनी तीन वेगवेगळ्या टप्प्यात केली. आखाती देशातील या श्रीमंत देशाचा जगातील त्या देशांमध्ये समावेश आहे, जिथे सर्वाधिक फाशी दिली जाते. 2021 मध्ये संपूर्ण वर्षभरात सौदी अरेबियामध्ये एकूण 69 जणांना फाशी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT