Woman Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arabia: सोशल मीडियाचा वापर केल्याप्रकरणी सौदी महिलेला 45 वर्षांची शिक्षा

Saudi Arabia: अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जगभरातून अनेक प्रकरणे समोर येत आहेत.

दैनिक गोमन्तक

Saudi Arabia: अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जगभरातून अनेक प्रकरणे समोर येत आहेत. विशेषत: सौदी अरेबियातून सातत्याने अशा घटना समोर येत आहेत, ज्यात अभिव्यक्तीच्या बदल्यात सरकार आणि न्यायव्यवस्था स्वत: शिक्षा देत आहेत. सोशल मीडियाचा वापर केल्याप्रकरणी एका महिलेला 45 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

खरे तर, सौदी अरेबियातील (Saudi Arabia) या महिलेचे नाव नूरा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेला फक्त एका ट्विटसाठी 45 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सौदी अरेबियाच्या सामाजिक जडणघडणीसाठी इंटरनेटचा वापर केल्याचा आरोप महिलेवर आहे. सौदी अरेबियातील न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नूरावर सायबर क्राइम विरोधी कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ट्विटरवर नूराचे अकाऊंट फारसे सक्रिय नसले तरी तिच्या ट्विटमुळे तिला जुलै 2021 मध्ये अटक करण्यात आली. आता विशेष न्यायालयात (Court) याच गुन्ह्यासाठी तिला दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात नूराला 45 वर्षांची शिक्षा झाली होती.

दुसरीकडे, या महिन्यात सौदी अरेबियातून अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. याआधी सौदी अरेबियातील एका महिलेला (Woman) ट्विटर वापरल्याबद्दल 34 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. लीड्स विद्यापीठात शिकणारा एक सौदी विद्यार्थी (Students) सुट्टीवर घरी आला होता. त्यानंतर त्याला 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्याच्यावर ट्विटरवर अकाऊंट असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याने काही यूजर्संना फॉलो करुन त्यांचे ट्विट रिट्विट केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT