Russian Missile Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Russian Missile Attack: रशियाने युक्रेनवरील हल्ले केले तीव्र, क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू; अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले...

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशिया सातत्याने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला करत आहे.

Manish Jadhav

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशिया सातत्याने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला करत आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून रशियाने हे हल्ले आणखी तीव्र केले आहेत. कीव-मॉस्को संघर्षादरम्यान बुधवारी रशियाने युक्रेनच्या चेर्निहाइव्ह शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला, तर 61 जण जखमी झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या मृत्यूंसाठी त्यांनी युक्रेनच्या हवाई संरक्षणाला जबाबदार धरले.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी निवेदन जारी करत म्हटले की, "जर युक्रेनकडे पुरेशी हवाई संरक्षण उपकरणे असती, तर असे हल्ले झाले नसते. दहशतवादी तेव्हाच लोकांना मारतात जेव्हा कोणी त्यांना रोखण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी तयार राहते."

मृतांमध्ये बहुतांश तरुण होते

चेर्निहाइव्ह शहराचे प्रमुख ओलेक्झांडर लोमाको यांनी सांगितले की, "मी स्वतः नुकसान झालेल्या वाहनांमध्ये रक्ताने माखलेले मृतदेह पाहिले. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण आहेत." त्यांनी पुढे सांगितले की, बचाव कर्मचारी अजूनही मृत लोकांचा शोध घेत आहेत. या हल्ल्यामुळे युक्रेनला हवाई संरक्षण उपकरणांची गरज असल्याचे दिसून आले.''

दरम्यान, चेर्निहाइव्ह हे शहर रशियाच्या सीमेवर वसलेले आहे. युक्रेनचे मंत्री इहोर क्लायमेन्को यांनी सांगितले की, "रशियन गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये 25 वर्षीय पोलिस लेफ्टनंटचा समावेश आहे." त्यांनी पुढे सांगितले की, "शेजारच्या घरातील एक महिला, जी आजारपणामुळे रजेवर होती, ती गंभीर जखमी झाली आहे."

दुसरीकडे, रशिया-युक्रेन संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात रशियाने चेर्निहाइव्हला घेरले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन लोकांना येथून हाकलल्यानंतर आणि युक्रेनच्या हवाई संरक्षणात सुधारणा झाल्यानंतर लोक या भागात परतले होते. चेर्निहाइव्ह रशिया आणि बेलारुसच्या सीमेजवळ, राजधानी कीवपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर आहे. या शहराची लोकसंख्या अंदाजे 2,50,000 आहे. बुधवारी रशियाने या भागात तीन क्षेपणास्त्रे डागली. युक्रेनची ताकद आता लष्करी साधनांच्या कमतरतेमुळे कमी होत चालली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SL: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Protest 2026: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

Yellow Alert In Goa: धुवांधार पाऊस अन् सोसाट्याचा वारा! गोव्यात पावसाची जोरदार बॅटिंग; हवामान खात्याकडून 3 दिवस 'यलो अलर्ट'

SCROLL FOR NEXT