russia ukraine war Dainik Gomantak
ग्लोबल

Russia- Ukraine War: युक्रेनच्या सैन्याने मिळवली रशियाच्या ताब्यातील महत्वाची जागा

Russia- Ukraine War: रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम हा फक्त या दोन देशावर झाला नाही, तर या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे.

दैनिक गोमन्तक

Russia- Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात होऊन दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र अद्याप हे युद्ध थांबलेले नाही. रशियाकडून सुरुवात केलेल्या या युद्धात मोठ्या प्रमाणात जीवीतहानी आणि वित्तहानी झालेली पाहायला मिळत आहे.

रशियाने ताब्यात घेतलेला प्रदेश सोडवण्यासाठी युक्रेन प्रयत्न करताना दिसत आहे. आता युक्रेनच्या सेनेला रोबोटाइन क्षेत्रात ताबा मिळवण्यात यश मिळाले असल्याचे युक्रेनकडून माहीती दिली आहे. याबरोबरच, सैनिकांनी संपूर्ण गावात रशियन सैनिक शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आणि संपूर्ण भागावर नियंत्रण प्रस्थापित केल्याचेही सांगण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहीतीनुसार, रोबोटाइन हे क्षेत्र युक्रेनसाठी अत्यंत महत्वाचे आहे. हा प्रदेश ओरिखिवपासून तोकमाककडे जाणार्‍या मोक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यावर 10 किमी अंतरावर आहे. या संपूर्ण प्रदेशातील रस्ते आणि रेल्वे नेटवर्कवर रशियाचे नियंत्रण आहे. त्यामुळे युक्रेनची ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे.

रशियन सैन्याला या भागातून बाहेर काढल्यानंतर युक्रेन रशियाला आणखी दक्षिणेकडे ढकलत आहे. आता रशिया यावर काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम हा फक्त या दोन देशावर झाला नाही, तर या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे.

अमेरिकेसारख्या देशांनी हे युद्ध थांबावण्यासाठी अनेकविध मार्गांचा अवलंब केला आहे. रशियाच्या व्यापारावर निर्बंध घालण्यात आले होते. त्याचबरोबर हे युद्ध थांबवण्यासाठी चेतावणीदेखील दिली होती.

मात्र दीड वर्षाच्या कालावधीनंतर हे युद्ध सुरु आहे. या युद्धात नागरिकांचे अतोनात हाल झाल्याचे पाहायला मिळाले. याबरोबरच रशियाकडून युक्रेनच्या महत्वाच्या ठिकाणांचा नाश केल्याचेही दिसून आले आहे. आता हे युद्ध कधी थांबणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT