Russia  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia सैन्य तळावर मोठा दहशतवादी हल्ला,11 ठार तर 15 जखमी

Ukraine Russia War: रशियम सैन्य तळावर झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्यात झाला 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

रशियन सैन्य तळावर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत. एकीकडे रशिया आणि युक्रेनचा संघर्ष सुरु आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरु आहेत. तर दुसरीकडे रशियन सैन्याच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी रशियन सैन्याच्या तळावर मोठा हल्ला झाला आहे. या आधीच राष्ट्रपती पुतिन यांनी नाटोला इशारा दिला होता.

  • युक्रेनजवळील रशियन सैन्य तळावर हल्ला

रशियाचा संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात दहशतवाद्यांनी शनिवारी युक्रेनच्या सीमेजवळील रशियाच्या सैन्य तळावर गोळीबार करत हल्ला केला. या दहशतवाद्यांनी बेशुट गोळीबार केला आहे. या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.

रशियन संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले, युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या नैऋत्य रशियाच्या बेलगोरोड भागातील सैन्य तळावर हा हल्ला झाला. दोन दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

सरावादरम्यान दोन स्वयंसेवक बनून आलेल्या सैनिकांनी इतर सैनिकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 11 सैनिकांचा मृत्यू झाला आणि 15 जण जखमी झाले आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाने या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटले आहे.

  • पुतिन यांचा नाटोला इशारा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी नाटोबाबत मोठे विधान करत इशारा दिला होता. रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामध्ये नाटो उतरल्यास मोठा विध्वंस होईल, असे पुतिन यांनी म्हटले होते. पुतिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर भाष्य केले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT