Russia-Taliban: Russia will invite Taliban for Moscow Talk Dainik Gomantak
ग्लोबल

रशियाची तालिबानशी जवळीक,मॉस्को चर्चेसाठी दोन्ही देश एकत्र

मॉस्को फॉरमॅट सहा पक्षीय प्रणालीवर आधारित वर्ष 2017 मध्ये निश्चित केले गेले होते.(Russia-Taliban)

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात (Afghanistan) सत्ता हस्तगत करणारा कट्टर इस्लामी गट तालिबानशी (Taliban) रशिया (Russia) आपली जवळीक वाढऊ पाहत आहे.आणि त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे कारण रशिया 20 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील मॉस्को मसुद्याच्या (Moscow Talks)बैठकीसाठी तालिबानच्या प्रतिनिधींना आमंत्रित करणार आहेत . TASS ने अफगाणिस्तानसाठी रशियन राष्ट्रपतींचे विशेष दूत आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या दुसऱ्या आशियाई विभागाचे संचालक जमीर काबुलोव यांच्या हवाल्याने एक अहवाल प्रकाशित केला आहे.याच अहवालानुसार, "अफगाणिस्तानवर प्रस्तावित मसुदा बैठकीसाठी रशिया तालिबानच्या प्रतिनिधींना आमंत्रित करेल."(Russia-Taliban: Russia will invite Taliban for Moscow Talk)

मात्र, तालिबानचे प्रतिनिधी कोणत्या स्तरावर असतील, हे काबुलोव्हने स्पष्ट केलेले नाही. मॉस्को फॉरमॅट सहा पक्षीय प्रणालीवर आधारित वर्ष 2017 मध्ये निश्चित केले गेले होते. रशिया, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान, इराण आणि भारत यांच्यातील विशेष प्रतिनिधींद्वारे सल्ला घेणे हा त्याचा हेतू होता.

अलीकडेच, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी तालिबानला शक्य तितक्या लवकर सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्यास सांगितले होते. आणि या सरकारने सर्व लोकांचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. जनतेला जी काही आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण केली पाहिजेत . अफगाणिस्तानातील दहशतवाद थांबवण्यासाठी, सर्वसमावेशक सरकार आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी रशिया अमेरिका, चीन आणि पाकिस्तान यांच्याशी जवळून काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. तालिबान्यांनी महिला आणि मुलींच्या अधिकारांचा आदर केला पाहिजे. तालिबान्यांनी जाहीरपणे जे सांगितले ते पूर्ण केलंच पाहिजे असे ठणकावून सांगितले होते.

दरम्यान तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर इस्लामिक अतिरेकी गट मध्य आशियातील माजी सोव्हिएत प्रजासत्ताकांमध्ये घुसखोरी करू शकतो, ज्याला मॉस्को आपला बचावात्मक बफर मानतो. तालिबानच्याकब्जानंतर मॉस्कोने ताजिकिस्तानमध्ये लष्करी सराव केला. सैन्य तैनात करण्यात आले .यावर पुतीन यांनी ताजिकचे राष्ट्राध्यक्ष इमामाली रखमोन यांच्याशी फोनवर संवाद देखील साधला होता . दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तानमधील ताज्या घडामोडींबाबत सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT