Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनवर हल्ला करुन कोणतेही नुकसान झाले नाही, फक्त फायदाच झाला: Vladimir Putin

Vladimir Putin: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला 6 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.

दैनिक गोमन्तक

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला 6 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. त्याचबरोबर पाश्चात्य देशांनीही रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. असे असूनही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणतात की, 'या युद्धाने केवळ फायदाच झाला. यामुळे रशियाचे जगावरील वर्चस्व वाढेल.' सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर युक्रेनविरुद्धची ही 'विशेष लष्करी कारवाई' एक टर्निंग पॉइंट असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रशियाच्या (Russia) पॅसिफिक सिटी व्लादिवोस्तोव येथे ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये पुतीन बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात युक्रेनचा (Ukraine) फारसा उल्लेख केला नाही. मात्र, युक्रेनबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, 'या युद्धाने केवळ फायदाच झाला, नुकसान नाही.'

पुतिन पुढे म्हणाले की, 'आमचे काहीही नुकसान झाले नाही आणि यापुढेही होणार नाही. अनावश्यक आणि हानीकारक अशी कारवाई होणार नाही. या युद्धामुळे आमचे सार्वभौमत्व अधिक भक्कम झाले. याशिवाय देश आतून मजबूत होईल.' या युद्धामुळे रशियामध्ये आणि जगभरात ध्रुवीकरण झाले आहे, हेही त्यांनी मान्य केले.

तसेच, 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते. रशिया त्याला 'स्पेशल ऑपरेशन्स' म्हणतो. युक्रेनियन सैन्याला रशियाचा सामना करावा लागला. या युद्धात दोन्ही बाजूचे अनेक सैनिक मारले गेले आहेत. युक्रेनने अद्याप शरणागती पत्करलेली नाही.

त्याचवेळी, पुतिन या युद्धातून बरेच काही मिळवण्याबाबत बोलत आहेत. तर दुसरीकडे, नाटोने या युद्धाविरोधात मोठी तयारी सुरु केली आहे. नाटोने पूर्व युरोपमध्ये आपली स्थिती मजबूत केली आहे. आता स्वीडन (Sweden) आणि फिनलंडला (Finland) सदस्य म्हणून समाविष्ट करण्याची योजना नाटोने आखली आहे. तर रशियाचा युक्रेनवरील हल्ला नाटोला रोखण्याच्या उद्देशाने होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

Goa Bench: चिंबलमधील बेकायदेशीर 43 बोअरवेल्स मालकांना मोठा दणका! गोवा खंडपीठाचे भूजल अधिकाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश

Goa Agriculture: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना; गरज भासल्यास नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी ग्वाही

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT