Vladimir Putin & Narendra Modi Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan वर चर्चेसाठी रशियाचे भारताला निमंत्रण नाही; चीन, पाकिस्तान राहणार उपस्थित

11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीला पाकिस्तान (Pakistan), चीन (China) आणि अमेरिका उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीवर बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी रशियाने (Russia) भारताला (India) आमंत्रित केलेले नाही. 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीला पाकिस्तान, चीन आणि अमेरिका उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे (Taliban) हल्ले वाढत असताना, रशियाने युद्धग्रस्त देशातील सर्व प्रमुख पक्षांपर्यंत हिंसा थांबवण्यासाठी आणि अफगाण शांतता प्रक्रियेला वेग देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

भारताने आमंत्रित न करण्याच्या मुद्द्याला फारसे महत्त्व न देता, भारत अफगाणिस्तान संदर्भात रशियाच्या नियमित संपर्कात असल्याचे सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, "आम्ही दोघेही विशेष धोरणात्मक भागीदारीने बांधलेले आहोत. आम्ही रशियासोबत नियमितपणे अफगाणिस्तानवर चर्चा करतो. 'विस्तारित ट्रॉइका' बैठक 11 ऑगस्ट रोजी कतारमध्ये होणार आहे. त्याच्या स्वरुपानुसार, आधी 18 मार्च आणि 30 एप्रिल रोजी चर्चा झाली. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि राष्ट्रीय सलोखा प्रक्रियेसाठी अटी निश्चित करण्यासाठी रशिया चर्चेचे ‘मॉस्को फॉर्मेट देखील आयोजित करत आहे.

या बैठकीत भारताचा समावेश होण्याची शक्यता ?

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी गेल्या महिन्यात ताश्कंद येथे सांगितले की, रशिया आणि भारत अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर परिणाम करू शकणाऱ्या इतर देशांसोबत काम करणे सुरू ठेवणार आहेत. या टिप्पण्यांनंतर, आगामी 'विस्तारित ट्रोइका' बैठकीत भारताचा समावेश होऊ शकतो अशी अटकळ होती.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक

दरम्यान, भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंदझी यांनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची 6 ऑगस्ट रोजी बैठक घेण्याच्या निर्णयाला सकारात्मक पाऊल म्हणून संबोधले. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती यांनी घोषणा केली की, भारताच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा केली जाईल. मामुंदजे यांनी ट्विट करत म्हटले की, "अफगाणिस्तानवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे आपत्कालीन सत्र बोलावणे हे एक सकारात्मक पाऊल आहे. दहशतवादी हिंसा आणि अत्याचारांमुळे अफगाणिस्तानमधील शोकांतिका रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने महत्वाची भूमिका निभावली पाहिजे. UNSC अध्यक्ष म्हणून तुमच्या प्रमुख भूमिकेबद्दल भारताचे आभार.

अफगाणिस्तानने आपत्कालीन सत्राची मागणी केली होती

तालिबानचा हिंसाचार थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलाविण्याबाबत अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद हनीफ आत्मर यांनी त्यांचे भारतीय समकक्ष एस जयशंकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर दोन दिवसांनी UNSC ची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत ऑगस्ट महिन्यासाठी UNSC चे अध्यक्ष आहे. भारत हा अफगाणिस्तानातील शांतता आणि स्थिरतेचा प्रमुख पक्ष आहे. युद्धग्रस्त देशामध्ये मदत आणि पुनर्बांधणी उपक्रमांमध्ये जवळपास 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. भारताने अफगाणिस्तानच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय शांतता आणि सलोखा प्रक्रियेला पाठिंबा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT