Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: अटक वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशाला पुतीन यांचा दणका, वॉन्टेड लिस्टमध्ये...!

Russia: रशियाच्या गृह मंत्रालयाने इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाच्या न्यायाधीशाविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.

Manish Jadhav

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेले युद्ध संपायचं काही नाव घेत नाही. यातच आता, रशियाच्या गृह मंत्रालयाने इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाच्या न्यायाधीशाविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.

याच न्यायाधिशाने मार्च महिन्यात रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. तेव्हा या न्यायाधीशाने त्यांच्यावर युद्धगुन्हेगारीचे आरोप लावले होते.

चौकशी समितीचे अध्यक्ष अलेक्झांडर बॅस्ट्रिकिन यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, 'रशियन एजन्सीला त्या न्यायाधीशाला वॉटेन्ड लिस्टमध्ये ठेवायचे आहे.'

विशेष म्हणजे, युक्रेनविरुद्ध युद्ध सुरु झाल्यापासून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन संपूर्ण युरोपच्या निशाण्यावर आहेत.

17 मार्च रोजी वॉरंट जारी करण्यात आले

युक्रेनियन मुलांना रशियात (Russia) पाठवण्याच्या कथित योजनेसाठी 17 मार्च रोजी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि रशियाच्या बाल हक्क आयुक्त मारिया लवोवा-बेलोवा यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले होते.

कथित गुन्ह्यांसाठी पुतिन वैयक्तिकरित्या जबाबदार आहेत, असे मानण्यास वाजवी कारणे असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

त्यानुसार, सैन्य आणि त्यांच्या अधीनस्थांनी केलेल्या कामावर ते नीट नियंत्रण ठेवू शकले नाही. आयसीसीने मॉस्कोच्या अधिकाऱ्यांवर युक्रेनवर विनाकारण हल्ला केल्याचा आरोप केला.

रशिया हा आयसीसीचा सदस्य नाही

रशिया आयसीसीचा सदस्य नाही. कारण त्यांच्या अनुपस्थितीत न्यायालय खटला चालवू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही रशियन अधिकाऱ्याला मॉस्कोच्या ताब्यात दिले जाईल किंवा रशियाबाहेर अटक केली जाईल.

इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टच्या या निर्णयावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. क्रेमलिनने आयसीसीची कारवाई अपमानजनक आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे.

अशी युद्धाची स्थिती आहे

युक्रेनमध्ये (Ukraine) रशियाचे विनाशकारी युद्ध सुरु असतानाच, निमलष्करी वॅगनर गटाचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांनी रशियन लष्करी नेतृत्वाच्या उच्च पातळीवर सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचा पर्दाफाश केला.

रशियन कमांडरांना मूर्ख म्हणत प्रीगोझिन यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्यावर गुन्हेगारी आदेशांसाठी दोषारोप केला आणि सैन्य रशियन प्रदेशाचे रक्षण करु शकेल का असा प्रश्नही विचारला.

प्रीगोझिन यांनी रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि त्यांचे चीफ ऑफ जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्यावर निशाणा साधत वॅगनर सैनिकांच्या मृतदेहासोबत एक व्हिडिओ देखील बनवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT