Romance leave Dainik Gomantak
ग्लोबल

Romance leave: कर्मचाऱ्यांना पगारासह मिळणार प्रजननासाठी 10 सुट्टया

या देशातील ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना आपल्या पत्नीसोबत एकत्र वेळ घालवण्यासाठी सुट्टी दिली जाते.

दैनिक गोमन्तक

सध्या प्रत्येकाची ऑफिस लाइफ बिझी झाली आहे. कमावर जाणारा पुरूष असो वा स्त्री आपल्या खाजगी आयुष्यात एकमेकांना हवा तसा वेळ देवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकजण आठवडाभर सुट्टीचीची वाट बघत असतो. त्यातही सुट्टीच्या दिवशी एखादं काम निघालं तर सुट्टी इन्जॉय करण्याच्या प्लॅनवर पाणी फेरल्या जाते. आणि पुन्हा आठवडाभर सुट्टीची वाट पाहावी लागते.

ऑफिसमध्ये जाणारा प्रत्येक व्यक्ती सुट्ट्यांचा आनंद घेण्याची व्यवस्थित प्लॅनिंग करत असतो. पण जगात एक असाही देश आहे जिथे ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना आपल्या पत्नीसोबत एकत्र वेळ घालवण्यासाठी सुट्टी (Romance leave) दिली जाते. तुम्हाला हे वाचून विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. कमी लोकसंख्येमुळे जपानी सरकार अडचणीत आले आहे.

जपान सरकारने ऑफिसमध्ये काम करणाऱ्या जोडप्यांना 10 दिवसांची प्रजनन रजा देण्याची योजना आखली आहे. जेणेकरून या कामगारांचा पगार कापला जाणार नाही. या खास सुट्टीची ऑफर जपानमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. जपान देशाची लोकसंख्येच्या कमी असल्याने हो देश संकटातून जात आहे.

जपानची लोकसंख्या 126 दशलक्षांपेक्षाही कमी आहे. आणि जपानचा प्रजनन दर सुमारे 1.4% आहे. म्हणून जपान सरकारने देशातील जोडप्यांना कुटुंब वाढवण्याचे आवाहन केले आहे. म्हणून देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी जपान सरकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रजननासाठी सुट्टी देत आहेत.

काय आहे योजनेचे स्वरूप?

जपानच्या सर्व कार्यालयांमधील जोडप्यांना ही रजा देण्यात येणार आहे. या देशातील कर्मचारी वर्षाला 10 सुट्ट्या या कारणासाठी घेऊ शकतात. या सुट्ट्यामध्ये कर्मचाऱ्यांना पगाराचं टेंशन न घेता आपल्या पार्टनरसोबत रोमान्स करता येणार आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सुट्यांमध्ये त्याचा पगार कापला जाणार नाही.

जपानमधील वृद्ध लोकसंख्येचा दर तरुण लोकसंख्येपेक्षा खूप जास्त आहे. जर हे चक्र असेच चालू राहिले तर 2040 पर्यंत जपानच्या एकूण लोकसंख्येच्या 5% लोक वृद्ध असतील. जपानने तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगती केली आहे परंतु कमी लोकसंख्येमुळे भविष्यात या देशाला अनेक संकटांना तोंड द्यावं लागू शकतं.

देशातील तरुण जोडप्यांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी सरकार आग्रह करत आहे. आणि देशाची लोकसंख्यां वाढावी म्हणूनच जपान सरकारला ही योजना कर्मचाऱ्यांसाठी आणावी लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akshay Kumar Property: मॉरिशस, कॅनडा आणि गोव्यात आलिशान व्हिला... 2,500 कोटींची संपत्ती आणि गाड्यांचा ताफा; 'अशी' आहे बॉलीवूडच्या 'खिलाडी'ची जीवनशैली

आमका आयआयटी नाका! कोडार येथे प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले Watch Video

IIT Goa: 'गोव्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची सवय लागलीय...'; प्रस्तावित आयआयटीवरुन मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा विरोधकांवर प्रहार

Gold Price: सोन्याच्या दरांनी मोडले सगळे रेकॉर्ड! एकाच दिवसात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा 1 लाख पार

वडिलांनी फोन काढून घेतला, मुलाचा संताप अनावर; मोबाईलच्या वेडापायी उचललं 'चुकीचं पाऊल'

SCROLL FOR NEXT