Pakistan Punjab In Road Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Pakistan Punjab In Road Accident: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

Pakistan Punjab In Road Accident: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिनी ट्रकच्या झालेल्या अपघातात पाच मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात अन्य नऊ जण जखमी झाले आहेत. बचाव कार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी अपघाताची माहिती दिली आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अपघातानंतर स्थानिक लोक मदतीसाठी धावले.

'रेस्क्यू-1122' नुसार, खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यातून पंजाब प्रांतातील खुशाब जिल्ह्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. लाहोरपासून सुमारे 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुशाबच्या पेंच पीर भागात हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एका वळणावर मिनी ट्रक रस्त्यावरुन घसरुन खड्ड्यात पडल्याने हा अपघात झाला.

त्यामुळे हा अपघात झाला

एका अधिकाऱ्याने सांगितले की, " एकाच कुटुंबातील पाच मुलांसह 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. नऊ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, वेगामुळे मिनी ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे हा अपघात झाला.’’

सीएम नवाज यांनी शोक व्यक्त केला

पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी या अपघातातील मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना चांगल्या उपचार सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना नवाज यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Jail Administration Report: 'राज्यातील कारागृहांच्या स्थितीचा सविस्तर अहवाल द्या', गोवा खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश; ‘सर्वोच्च’ निकालाची दखल

Goa Politics: ‘आरजीपी’तील अंतर्गत वादाबाबत आमदार बोरकरांची अप्रत्यक्ष पुष्‍टी; आल्‍मेदांवर कारवाईवर चर्चा सुरु असल्‍याचेही केले स्‍पष्‍ट

Haath Kaatro Khamb History: "लोकांचे हात कापले जायचे, याचे पुरावे कुठे?" फेरेरांच्या सवालाने 'हात कातरो' खांबाचा वाद विकोपाला; पुराव्यांच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड?

Mandovi River Casino: मांडवीतील कॅसिनोंचे भवितव्य टांगणीला! 'इनफ इज इनफ'च्या याचिकेवर हायकोर्टात जोरदार खडाजंगी; सरकारचा आक्रमक पवित्रा

Ponda Assembly Bye-Election: कोर्टाच्‍या निकालानंतर गप्‍प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; फोंडा पोटनिवडणूकप्रश्‍‍नी आयोगाला द्यावी लागणार उत्तरे!

SCROLL FOR NEXT