Smoking Dainik Gomantak
ग्लोबल

सावधान! धूम्रपानामुळे गंभीर कोरोना संसर्गाचा धोका: रिपोर्ट

धूम्रपान (Smoking) करत असाल तर सावधान! धूम्रपान केल्याने गंभीर कोरोना संसर्गाचा (Covid 19) धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

धूम्रपान (Smoking) करत असाल तर सावधान! धूम्रपान केल्याने गंभीर कोरोना संसर्गाचा (Covid 19) धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. या प्रकरणात मृत्यूचा धोका देखील वाढू शकतो. पूर्वीच्या अभ्यासातून हे आधीच स्पष्ट झाले आहे की, धूम्रपान देखील संसर्गाचा एक घटक आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल थोरॅक्स (Journal Thorax) मध्ये प्रकाशित झाले आहेत. अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यास असून, ज्यात धूम्रपान आणि कोरोना विषयक आनुवंशिक डेटाचा समावेश करण्यात आला आहे. ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रमुख संशोधक अॅशले क्लिफ्ट (Ashley Clift) म्हणाले, 'आमचे निष्कर्ष स्पष्टपणे दर्शवतात की, धूम्रपानाचा गंभीर कोरोना संसर्गाच्या धोका संबवत आहे.

चार लाख 21 हजार 469 प्रतिभागीवर केलेल्या अभ्यासाच्या आधारे संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. यूकेमध्ये गेल्या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत करण्यात आलेल्या या अभ्यासात धूम्रपान आणि गंभीर कोरोना संसर्गाच्या संबंधाकडे पाहिले गेले. संशोधकांच्या मते, जे लोक सिगारेट ओढतात त्यांना कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 80 टक्के जास्त आढळून आले आहेत. या लोकांमध्ये संसर्गामुळे मृत्यू होण्याचा धोकाही जास्त असल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT