Rishi Sunak  Dainik Gomantak
ग्लोबल

'मला भारतीय वंशाचा असल्याचा अभिमान...' G20 शिखर परिषदेपूर्वी ऋषी सुनक यांचे गौरवोद्गार

British PM Rishi Sunak: G20 शिखर परिषदेबाबत देशात उत्साहाचे वातावरण आहे. जगभरातील दिग्गज नेते भारतात पोहोचणार आहेत.

Manish Jadhav

British PM Rishi Sunak: G20 शिखर परिषदेबाबत देशात उत्साहाचे वातावरण आहे. जगभरातील दिग्गज नेते भारतात पोहोचणार आहेत.

याच शृंखलेत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे देखील या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी या आठवड्याच्या शेवटी भारतात पोहोचणार आहेत.

या सगळ्या दरम्यान त्यांची एक मुलाखत समोर आली आहे, ज्यामध्ये त्यांनी भारत आणि त्यांच्या संबंधांबद्दल सांगितले आहे. सुनक म्हणाले की, मला भारतीय वंशाचा असल्याचा अभिमान आहे.

भारत (India) आणि ब्रिटनमधील संबंध आगामी काळात आणखी घट्ट होतील. आम्ही भारतासोबत मिळून कट्टरवादाचा मुकाबला करत आहोत.

भारतासाठी हीच योग्य वेळ आहे

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सुनक म्हणाले की, भारतातील विविधता हा जगासाठी मोठा संदेश आहे. 2023 हे भारतासाठी मोठे वर्ष आहे.

भारताने असे जागतिक नेतृत्व दाखवणे हे आश्चर्यकारक आहे. G20 च्या अध्यक्षपदाबाबत सुनक म्हणाले की, भारताला G20 चे अध्यक्षपद मिळण्याची हीच योग्य वेळ आहे. भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Economy) होण्याच्या मार्गावर आहे.

खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत सुनक म्हणाले की, आम्ही आणि भारत खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात एकत्र काम करत आहोत. ब्रिटनला कोणत्याही प्रकारचा कट्टरतावाद मान्य नाही.

भारतासोबतच्या संबंधांचा अत्यंत अभिमान आहे

भारताशी असलेल्या माझ्या नात्याचा मला खूप अभिमान आहे, असे सुनक म्हणाले. माझी पत्नी भारतीय आहे आणि एक अभिमानी हिंदू या नात्याने माझा भारत आणि भारतातील लोकांशी नेहमीच संबंध राहील.

मला माझ्या सासऱ्यांचा आणि त्यांच्या कामगिरीचा खूप अभिमान आहे. त्यांनी शून्यातून मोठी गगनभरारी घेतली आहे, असेही सुनक पुढे म्हणाले.

पीएम मोदींची भेट घेणार

खरे तर, त्यांची मुलाखत अशा वेळी आली आहे, जेव्हा भारत पुढील आठवड्यात नवी दिल्लीत G20 शिखर परिषद आयोजित करत आहे. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचेही भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

त्यांनी पुढे असेही म्हटले की, 'पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान जागतिक आव्हानांवरही चर्चा होईल. यासोबतच ब्रिटन आणि भारताच्या संबंधावर देखील आम्ही चर्चा करु.' ऋषी सुनक यांच्या भारतात येण्याबद्दल त्यांच्या नातेवाईकांमध्ये मोठी उत्सुकता असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT