Rishi Sunak & PM Modi Dainik Gomant Prime Minister Narendra Modiak
ग्लोबल

Rishi Sunak भडकले, PM मोदींच्या डॉक्युमेंट्रीवरुन ब्रिटिश संसदेत गदारोळ

2002 च्या गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या बीबीसीच्या माहितीपटावरुन गदारोळ झाला.

दैनिक गोमन्तक

Rishi Sunak & PM Modi: 2002 च्या गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या बीबीसीच्या माहितीपटावरुन गदारोळ झाला. गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या ताज्या माहितीपटाचा मुद्दा ब्रिटिश संसदेत चांगलाच गाजला. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे स्वत: पंतप्रधान मोदींचा बचाव करताना दिसले. पीएम मोदींवरील बीबीसीच्या माहितीपटावर सुनक यांनी आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, ब्रिटीश संसदेत (Parliament) पीएम मोदींचा बचाव करताना सुनक यांनी बीबीसीच्या माहितीपटापासून स्वतःला दूर केले. डॉक्युमेंट्रीमध्ये ज्या पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका चित्रित करण्यात आली, त्याच्याशी आपण सहमत नाही, असे ते म्हणाले. पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी ब्रिटिश संसदेत या वादग्रस्त माहितीपटाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सुनक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

बीबीसीच्या अहवालावर हुसैन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुनक म्हणाले की, "या (मुद्द्यावर) यूके सरकारची भूमिका स्पष्ट आहे. याबाबत सरकारची भूमिका बदललेली नाही. नक्कीच, आम्ही छळ सहन करत नाही, कुठेही असो. मात्र, आदरणीय सदस्यांच्या मताशी मी अजिबात सहमत नाही."

दुसरीकडे, BBC ने 2002 च्या गुजरात दंगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचा वेध घेणारी दोन भागांची मालिका प्रसारित केली. माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर वाद सुरु झाला. त्यानंतर बीबीसीने काही निवडक प्लॅटफॉर्मवरुन ते काढून टाकले आहे.

भारतीय वंशाच्या प्रमुख ब्रिटिश नागरिकांनीही या माहितीपटाचा निषेध केला आहे. प्रख्यात यूके नागरिक लॉर्ड रामी रेंजर म्हणाले की, "बीबीसीने एक अब्जाहून अधिक भारतीयांना दुखावले आहे."

ही डॉक्युमेंटरी डिसइन्फॉर्मेशनचा भाग आहे: भारत

भारताने गुरुवारी 2002 च्या गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या माहितीपटाला "प्रचाराचा एक भाग" असे संबोधले. ते स्पष्टपणे पक्षपात, वस्तुनिष्ठतेचा अभाव आणि वसाहतवादी मानसिकता दर्शवते. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये झालेल्या दंगलीवर हा माहितीपट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT