Ocean Beneath Earth’s Crust Dainik Gomantak
ग्लोबल

Ocean Beneath Earth’s Crust: पृथ्वीच्या पोटात 'महासागर'; 700 किलोमीटर खाली आढळला पाण्याचा नवा साठा

Ocean Beneath Earth’s Crust: अमेरिकेतील इलिनॉय येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली पाण्याचे प्रचंड साठे शोधून काढले आहेत.

Manish Jadhav

Ocean Beneath Earth’s Crust: वैज्ञानिक शोध आणि मिळालेल्या उपलब्धींनी जगाला मंत्रमुग्ध केले आहे. ज्यामध्ये मग सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलपासून ते आतापर्यंतच्या सर्वोच्च तापमानापर्यंत पोहोचलेल्या दक्षिण कोरियाच्या फ्यूजन रिॲक्टरपर्यंत, अशा शोधांनी खरंच चकीत केले आहे. आपण शाळेत असताना शिकलो आहोतच की, पृथ्वीवर सुमारे 71 टक्के पाणी आहे. यामध्ये महासागर, नद्या, तलाव यांच्या पाण्याचा समावेश होतो. आता नुकत्याच लागलेल्या एका शोधामुळे पृथ्वीवर पाण्याचा नवीन स्रोत सापडला आहे. अमेरिकेतील इलिनॉय येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली पाण्याचे प्रचंड साठे शोधून काढले आहेत. विशेष म्हणजे, पृथ्वीच्या आत असलेले पाणी तिच्या पृष्ठभागावर असलेल्या पाण्याच्या तिप्पट असू शकते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 700 किलोमीटर खाली पाण्याचा नवीन साठा सापडला आहे.

एका रिपोर्टनुसार, पृथ्वीवरील पाण्याच्या उत्पत्तीचे संकेत शोधत असताना वैज्ञानिकांना ही माहिती मिळाली. त्याला रिंगवूडाइट (Ringwoodite) नावाच्या मिनरलच्या आत लपलेल्या महासागराची माहिती मिळाली. या संशोधनामुळे पृथ्वीवरील जलचक्र समजून घेण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, सापडलेले पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या एकूण पाण्यापेक्षा तिप्पट आहे.

नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ स्टीव्हन जेकबसेन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आम्हाला पृथ्वीवरील पाणी पृथ्वीच्या आतून आल्याचे विश्वासार्ह पुरावे मिळाले आहेत. त्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी, शास्त्रज्ञांनी अमेरिकेत स्थापित 2000 सिस्मोग्राफ वापरले. त्यांनी गेल्या 500 भूकंपांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लहरींचे परीक्षण केले. भूकंपाच्या लहरींचा पृथ्वीच्या गाभ्यामधून गेल्यावर त्यांचा वेग कमी झाला. यावरुन पृथ्वीच्या आतील खडकांमध्ये पाणी असल्याचे उघड झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT