Flood  Dainik Gomantak
ग्लोबल

सुल्तानीनंतर Pakistan त अस्मानी संकट; कराचीसह अनेक शहरे पाण्याखाली

Pakistan News: पाकिस्तानातील सिंध आणि बलुचिस्तान प्रांतात संततधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan News: पाकिस्तानातील सिंध आणि बलुचिस्तान प्रांतात संततधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. कराचीसह अनेक शहरे पहिल्याच पावसात पाण्याखाली गेली आहेत. या बिकट परिस्थितीमुळे अनेक लोक मरणही पावले आहेत. आता पुन्हा एकदा पावसाने कहर केला आहे. एकट्या सिंध आणि बलुचिस्तानमध्ये मंगळवारी आठ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले आहेत. सिंधमधील खैरापूर जिल्ह्यात घराचे छत कोसळल्याने एका व्यक्तीचा आणि त्याच्या दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी त्यांची पत्नी आणि दोन मुलीही गंभीर जखमी झाल्या आहेत. कराचीमध्ये (Karachi) सलग तिसर्‍या दिवशी एवढा पाऊस पडला की, रस्त्यांची दुरवस्था झाली.

दुसरीकडे, अनेक शहरात गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. मीरपूरखास, लरकाना, दादू या सर्व शहरांमध्ये पूर आला आहे. बलुचिस्तानच्या (Balochistan) लासबेला जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे शेकडो लोक गावांमध्ये अडकले असून बचाव कार्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तसेच, कराची आणि क्वेटासारख्या शहरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. याचे कारण अनेक ठिकाणी महामार्गाचा मोठा भाग पावसात वाहून गेला आहे. पुलाला तडे गेले आहेत. अशा परिस्थितीत लोकांना रस्त्यावर सोडणे जीवघेणे ठरु शकते. तीन पूल तुटल्याने अनेक शहरांचा संपर्क तुटला आहे.

शिवाय, लासबेला येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, क्वेटा-कराची महामार्गावरील पाच ठिकाणी रस्त्याचा भाग खचला आहे. त्यामुळे लासबेला ते ग्वादार दरम्यानची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 5 किमीच्या परिसरात महापूराची स्थिती निर्माण झाली आहे. कराचीमध्ये दरवर्षी पायाभूत सुविधांच्या अभावी अशा समस्या उद्भवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Construction: बेकायदा बांधकामांची माहिती द्यायला टाळाटाळ? पंचायत सचिवांना 10 हजारांहून अधिक दंड! गोवा खंडपीठाचा कठोर इशारा

BJP Election Preparation: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ताकदीनिशी तयारी; भारती पवार-शिवप्रकाशांच्या उपस्थितीत CM सावंत-दामू नाईकांच्या बैठका

खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

SCROLL FOR NEXT