Rafah Massacre Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: अनेकजण जिवंत जळाले, गाझा नंतर राफाहमध्ये इस्रायली नरसंहार; 24 तासांत 160 जणांचा मृत्यू

Manish Jadhav

Rafah Massacre: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिकच विखारी बनत चालले आहे. इस्त्रायली सैनिकांनी गाझानंतर आता राफाह शहराला टार्गेट केले आहे. इस्त्रायलने राफाह शहरावर जोरदार हवाई हल्ले केले. गाझाला स्मशानभूमीत रुपांतरित केल्यानंतर इस्रायली सैन्याने राफाहमध्ये कहर केला. जगातील सर्व देशांच्या आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या (आयसीसी) इशाऱ्याला न जुमानता इस्त्रायली सैन्याने राफाह शहरावर हल्ले केले. रविवारी इस्रायली सैन्याने राफाहच्या निर्वासितांच्या छावण्यांवर हल्ला केला.

एपीच्या वृत्तानुसार, गाझा आणि वेस्ट बँकमधून जीव मुठीत धरुन पळून जाणाऱ्या निर्वासितांवर इस्त्रायलने हा हवाई हल्ला केला. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत ताल अस-सुलतान, जबलिया, नुसिरत आणि गाझा शहरात इस्रायली हल्ल्यात किमान 160 नागरिक ठार झाले आहेत. छावण्यांवरील हल्ल्यानंतरचे दृश्य इतके भयानक आहे की, काही ठिकाणी मृतदेह जळत आहेत, तर काही ठिकाणी लोकांचा आरडाओरडा सुरु आहे, तर काही ठिकाणी भयान शांतता पसरली आहे.

गाझा आणि वेस्ट बँकमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, 15 दिवसांपूर्वी इस्रायली हल्ल्यातून पळून गेलेल्या आणि निर्वासितांच्या छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांवर इस्रायलने हल्ले केले आहेत. अंधारात केलेल्या या हल्ल्यात शेकडो लोक मारले गेले. अनेकजण रात्री शांत झोपले होते. ते झोपेतच हे जग सोडून गेले. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, विस्थापित लोकांसाठी बांधलेल्या सेंटरवर इस्रायलने हा हवाई हल्ला केला, ज्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. डझनभरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.

इस्रायलचा वेगळा दावा

गाझा आणि वेस्ट बँक अधिकाऱ्यांच्या दाव्याच्या विरोधात इस्रायली लष्कराने आपल्या निवेदनात हमासच्या छावणीवर हल्ला केल्याचे म्हटले. इस्रायलने हमास चीफ ऑफ स्टाफ यासिन राबिया आणि वेस्ट बँक डिव्हिजन कमांडर खालेद नागर यांची हत्या केल्याचा दावा केला आहे. डझनभर दहशतवादी मारल्याचा दावाही इस्त्रायलकडून करण्यात आला आहे. IDF च्या दाव्याच्या विरोधात, हमासने या हल्ल्यास ‘नरसंहार’ म्हटले. हमासच्या (Hamas) प्रवक्त्याने सांगितले की, गाझा नंतर आता राफाहमध्येही इस्रायली सैन्याने निरपराधांची हत्या केली. याची किंमत त्यांना मोजावी लागेल.

बरेच लोक जिवंत जाळले

पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ताल अस-सुलतान, जबलिया, नुसिरत आणि गाझा सिटी येथे गेल्या 24 तासांत झालेल्या हल्ल्यात किमान 160 नागरिकांचा (Citizens) मृत्यू झाला. राफाहमधील विस्थापितांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असलेल्या ठिकाणावर इस्त्रायली सैन्याने हल्ला केला, असे अल जझीराने वृत्त दिले. इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात अनेक लोक जिवंत जाळले गेले. हाजारो लोक सेंटरमध्ये शांत झोपले होते. झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. गाझा आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवदेनात सांगण्यात आले की, छावणीवरील हल्ल्यात 35 लोक ठार झाले आणि डझनभर जखमी झाले, ज्यात मुले आणि महिला आहेत.

इस्रायलने नरसंहार थांबवावा

इस्त्रायली हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जगभरातून पुन्हा एकदा युद्धविरामाची मागणी जोर धरु लागली आहे. कॅनडातील शीख नेते जगमीत सिंग यांनी ट्विट करुन या घटनेवर खेद व्यक्त केला आणि इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धात तात्काळ युद्धविरामाची मागणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT