Quetta Blast Dainik Gomantak
ग्लोबल

Quetta Blast: पाकिस्तानातील क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; 10 जणांचा मृत्यू, 32 हून अधिक जखमी Watch Video

pakistan military headquarters blast: पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील क्वेटा शहरात आणखी एक स्फोट झाला आहे. या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३२ जण जखमी आहेत.

Sameer Amunekar

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांत पुन्हा एकदा दहशतीने हादरला आहे. क्वेटा शहरात झालेल्या मोठ्या स्फोटात आतापर्यंत किमान १० जणांचा मृत्यू झाला असून, ३२ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण पसरले आहे.

लष्करी मुख्यालयाजवळ स्फोट

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा स्फोट क्वेट्यातील फ्रंटियर कॉर्प्सच्या मुख्यालयाजवळ झाला. मंगळवारी संध्याकाळी अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आले आणि त्यानंतर जोरदार स्फोट झाला. हा भाग संवेदनशील मॉडेल टाउन आणि आपस निवासी क्षेत्राजवळ असल्याने लोकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. स्फोट इतका तीव्र होता की आसपासच्या घरांचे दरवाजे-खिडक्या फुटल्या, तर काही इमारतींचे नुकसान झाले.

बलुचिस्तानचे आरोग्य मंत्री बख्त मुहम्मद काकर आणि आरोग्य सचिव मुजीब-उर-रहमान यांनी तातडीने क्वेट्यातील सिव्हिल हॉस्पिटल, बीएमसी हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटरमध्ये आणीबाणी लागू केली आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ नर्सेस, फार्मासिस्ट आणि पॅरामेडिकल स्टाफ यांना कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जखमींवर उपचार सुरू

बलुचिस्तान आरोग्य विभागाचे मीडिया समन्वयक डॉ. वसीम बेग यांनी सांगितले की, या स्फोटात जखमी झालेल्या १९ जणांना क्वेट्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघात व आपत्कालीन विभाग तसेच ट्रॉमा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हादी काकर आणि ट्रॉमा सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अरबाब कामरान स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

परिसरात भीतीचे वातावरण

या स्फोटानंतर सुरक्षा दलांनी परिसर सील करून तपास सुरू केला आहे. स्थानिक लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अद्याप या स्फोटामागे कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. तथापि, या घटनेमुळे बलुचिस्तानमधील असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

2 October Dry Day: महात्मा गांधी जयंती निमित्ताने गोव्यात 'कॅसिनो' राहणार बंद, 'ड्राय डे'ची घोषणा; सरकारी आदेश जारी

गोव्यात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून स्वाक्षरी मोहीम

Suryakumar Yadav: आशिया कप जिंकल्यानंतर 'सूर्या'ची गोव्यात एंट्री! मंत्री माविन गुदिन्हो यांनी केलं स्वागत Watch Video

Goa Cabinet Decisions: मंत्रिमंडळाचा ‘डबल धमाका’! 'म्हजे घर' योजनेअंतर्गत घरांसाठी 'दर' निश्चित; दिव्यांग विभागात 28 नवीन पदे मंजूर

Womens World Cup 2025: क्रिकेट विश्वचषक रंगला देशभक्तीच्या सुरांनी, श्रेया घोषालनं गायलं भारताचं राष्ट्रगीत, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT