Prime Minister Boris Johnson Dainik Gomantak
ग्लोबल

पंतप्रधान बोरिस जॉन्सन अन् अर्थमंत्र्यांना भरावा लागणार दंड

लॉकडाऊन दरम्यान पार्टी आयोजित करणे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Prime Minister Boris Johnson) आणि त्यांचे भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांना महागात पडले आहे.

दैनिक गोमन्तक

ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. लॉकडाऊन दरम्यान पार्टी आयोजित करणे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) आणि त्यांचे भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांना महागात पडले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, सरकारच्या लॉकडाऊन (Lockdown) पार्टीसाठी दोघांनाही दंड ठोठावण्यात येणार आहे. डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, "पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना आज माहिती मिळाली आहे की, महानगर पोलिस त्यांना दंडाची नोटीस बजावणार आहेत."

दरम्यान, या दोन्ही नेत्यांवर लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाला पार्टीगेट स्कँडल असे नाव देण्यात आले आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी डाऊनिंग हाऊसमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. यानंतर विरोधकांनी जॉन्सन यांच्यावर टीकेची झोड उठवली. जॉन्सन यांनी यासंबंधी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये माफीही मागितली आहे. पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 10 डाऊनिंग स्ट्रीटच्या गार्डनमध्ये आयोजित पक्षाला ईमेल केलेले निमंत्रण पत्र मीडियामध्ये समोर आल्यानंतर जॉन्सन यांच्यावर विरोधी मजूर पक्ष तसेच त्यांच्या स्वतःच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांचा दबाव होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT