President Volodymyr Zelenskyy  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine Meeting: अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले...चर्चेची संधी गमावू शकत नाही'

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये (Ukraine) भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अमेरिका आणि युरोपीय देश युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आले असतानाच रशिया युक्रेनवर (Ukraine) युध्द लादण्याचा प्रयत्न करत आहे. पाश्चिमात्य देशांच्या वाढत्या दबावानंतर रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देशाच्या न्‍यूक्लियर फोर्सला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, युक्रेनने बेलारुसच्या सीमेवर रशियाशी चर्चा करण्याचे मान्य केले आहे. मात्र, आम्ही शरणागती पत्करणार नाही. आम्ही एक इंचही जमीन सोडणार नाही, असे युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आहे. (President Volodymyr Zelenskyy Does Not Want To Miss The Opportunity To Discuss With Russia)

दुसरीकडे, युक्रेन पोलिसांनी सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. सरकार भारतीयांना परत मायदेशात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. पोलंड सीमेवर विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेनचे प्रतिनिधी बेलारुस सीमेवर युद्धाच्या दरम्यान शांतता चर्चा करणार आहेत. परंतु यादरम्यानच झेलेन्स्की म्हणाले, 'या चर्चेतून फारशी आशा नाही, तरीही ही आम्ही संधी गमावू इच्छित नाही.'

दरम्यान, कीवमधील वीकेंड कर्फ्यू हटवण्यात आला आहे. भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाण्यास सांगितले आहे. मात्र सॅटेलाइट इमेजमध्ये युक्रेनची राजधानी असलेल्या कीवकडे निघालेला रशियन लष्कराचा ताफा दिसत आहे. साडेतीन किलोमीटर लांबीच्या ताफ्यात शेकडो लष्करी वाहने, रणगाडे यांचा समावेश आहे.

त्याचवेळी युक्रेनवरील हल्ल्यानंतर चौफेर निर्बंधांनी रशिया घेरण्यात आले आहे. यातच पुतीन यांनी अण्वस्त्रे हाय अलर्टवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर अण्वस्त्रांबाबत पुतीन यांच्या आदेशामुळे जग पुन्हा एकदा नव्या संकटाकडे जात आहे. यादरम्यान नाटोने भूमिका स्पष्ट करताना म्हटले, 'पुतिन त्यांच्या वक्तव्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण करत आहेत.'

तसेच, युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी युद्ध सुरु झाल्यानंतर बेलारुसशी चर्चा करण्यापूर्वी स्पष्ट केले होते की, "आम्ही आत्मसमर्पण करणार नाही, आम्ही एक इंचही जमीन देणार नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

Goa Fisheries Projects Pending: गोव्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला निधीचा फटका! 53 कोटी मिळाले; पण 6 वर्षांत अवघे 47 कोटीखर्च, केंद्रीयमंत्र्यांचा संसदेत खुलासा

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

SCROLL FOR NEXT