PM Shehbaz Sharif  Dainik Gomantak
ग्लोबल

PM Shehbaz Sharif Video: पीएम शरीफ यांनी महिलेकडून घेतली छत्री, पावसात तिला एकटे सोडले; लोक म्हणाले- 'पाकिस्तानला लाज...'

PM Shehbaz Sharif: पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हेही सध्या परदेश दौऱ्यावर आहेत.

Manish Jadhav

PM Shehbaz Sharif Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हेही सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ फ्रान्सच्या दौऱ्यावर असून पॅरिसमध्ये दोन दिवसीय न्यू ग्लोबल फायनान्सिंग पॅक्ट समिटमध्ये सहभागी होण्यासाठी ते गुरुवारी राजधानी पॅरिसला पोहोचले.

मात्र, त्यांच्या आगमनानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या स्वागताशी संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केल्याने या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे.

व्हिडिओमध्ये, पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पॅलेस ब्रोग्नियार्ट येथे पोहोचताना दिसत आहेत. पण पंतप्रधान शरीफ गाडीतून खाली उतरले तेव्हा तिथे जोरदार पाऊस पडत आहे. पंतप्रधानांसाठी एक महिला प्रोटोकॉल अधिकारी गाडीच्या बाहेर छत्री घेऊन उभी आहे.

पावसात भिजत सोडले

दरम्यान, छत्री घेण्यापूर्वी पंतप्रधान शरीफ महिला अधिकाऱ्याला काहीतरी बोलत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर ते महिला अधिकाऱ्याकडून छत्री घेतात आणि स्वतः छत्री धरुन पुढे जातात. ती महिला अधिकारी पावसात भिजत त्यांच्या मागे येते.

मात्र, पीएम शरीफ यांच्या या वागण्यावरुन सोशल मीडियावर नवी चर्चा सुरु झाली आहे. काही लोकांनी याला "Good Gesture" म्हणून संबोधले तर काहींनी त्यांचे वर्तन "निराशाजनक" असल्याचे मानले.

दुसरीकडे, पंतप्रधानांचे कौतुक करताना ट्विटरवर एका यूजर्सने म्हटले की, पंतप्रधान शाहबाज शरीफ त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. साधेपणाचे आणखी एक आदर्श ठेवत त्यांनी स्वतःच छत्री घेतली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल झाला आहे.

पावसात एकटे का सोडले

मात्र, दुसऱ्या युजरला पंतप्रधानांचे हे वागणे आवडले नाही. सैथ अब्दुल्ला म्हणाले की, पंतप्रधानांनी त्या महिला अधिकाऱ्याला पावसात का सोडले? शाहबाज शरीफ, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्याचवेळी शहरयार एजाज या अन्य एका युजरनेही नाराजी व्यक्त करत महिलेला पावसात एकटे सोडल्याचे सांगितले. ही पाकिस्तानसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

तसेच, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरुन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ गुरुवारपासून सुरु झालेल्या दोन दिवसीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT