PM Narendra Modi Russia Visit 
ग्लोबल

Breaking: PM मोदींना मिळाला रशियाचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले...

PM Narendra Modi Russia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले.

Manish Jadhav

PM Narendra Modi Russia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वात प्रतिष्ठित नागरी सन्मान 'द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल' देऊन अधिकृतपणे सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "...रशियाच्या सर्वोच्च (नागरी) सन्मानाने मला सन्मानित केल्याबद्दल मी तुमचे (राष्ट्रपती पुतिन) मनापासून आभार मानतो.''

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, 'हा सन्मान केवळ माझा नाही, तर 140 कोटी भारतीयांचा आहे. भारत आणि रशिया यांच्यातील शतकानुशतके मैत्रीचे हे द्योतक आहे. दोन्ही देशांच्या भागीदारीचा हा सन्मान आहे. पुतीन यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि रशियामधील संबंध गेल्या 25 वर्षांमध्ये मजबूत झाले आहेत. दोन्ही देशातील धोरणात्मक भागीदारीचा हा सन्मान आहे... दोन्ही देशांदरम्यान तुम्ही जो धोरणात्मक संबंधांचा पाया घातला तो काळाच्या ओघात मजबूत होत गेला.''

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, "क्रेमलिनमध्ये हा मानद पुरस्कार (ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू) प्रदान करताना मला आनंद होत आहे... दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी तुम्ही महत्त्वपूर्ण योगदान दिले.''

पंतप्रधान मोदींच्या या भेटीबद्दल रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव खूप उत्साहित दिसले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा अनेक अर्थांनी खूप खास आहे. त्यांनी द्विपक्षीय अजेंडाच्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली. तसेच, त्यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थिती, G20, BRICS, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये आमच्या सहकार्यावर चर्चा केली.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: सत्तरीतील वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाचा भक्ती दंग

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

SCROLL FOR NEXT