Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
ग्लोबल

G7 Summit: PM मोदींना भेटण्यासाठी जो बायडन आले धावत, पाहा Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी G-7 शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची भेट घेतली.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी G-7 शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची भेट घेतली. ग्रुप फोटो काढण्यापूर्वी या नेत्यांमध्ये चर्चाही झाली. यावेळी सर्व नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या.

दरम्यान, असाच एक क्षण पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्यात पाहायला मिळाला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अचानक येतात आणि मागून पंतप्रधान मोदींच्या खांद्यावर हात ठेवतात. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी हस्तांदोलन करत आहेत, तेव्हा अचानक जो बायडन धावत येतात आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून पीएम मोदींना काहीतरी सांगतात. पीएम मोदी देखील मागे वळून पाहतात आणि नंतर दोन्ही नेते हसतात. त्यानंतर एकमेकांशी हस्तांदोलन करतात.

दुसरीकडे, ग्रुप फोटो काढण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी कॅनडाच्या पंतप्रधानांशी संवाद साधला. संध्याकाळी दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे. G7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी रविवारपासून दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. जर्मनीचे (Germany) चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी त्यांचे दक्षिण जर्मनीतील शिखर परिषदेत स्वागत केले.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विटर करत म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) राष्ट्राध्यक्ष जो बायडन, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भेट घेतली." पंतप्रधान मोदींनी ग्रुप फोटोसोबत एक कॅप्शन देखील दिले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, "G-7 परिषद जागतिक स्तरावरील नेत्यांची समेट आहे." मे महिन्यात जपानमधील क्वाड समिटमध्ये भेटल्यानंतर मोदी आणि बायडन यांच्यातील ही पहिलीच भेट होती. जर्मन प्रेसीडेंसीने अर्जेंटिना, भारत, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिकेला बव्हेरियातील इल्लामाऊमध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT