Philippines MV June Aster ferry catches fire Dainik Gomantak
ग्लोबल

Philippines Ship Accident: फिलीपिन्समध्ये समुद्रात जहाजाला भीषण आग; 5 जणांचा मृत्यू, 80 हून अधिक बेपत्ता Watch Video

Philippines Ship Accident Video: फिलीपिन्समध्ये समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. पलावन बेटाजवळ बुधवारी रात्री MV June Astor या जहाजाला अचानक भीषण आग लागली.

Sameer Amunekar

फिलीपिन्समध्ये समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. पलावन बेटाजवळ बुधवारी रात्री MV June Astor या जहाजाला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर 80 हून अधिक प्रवासी अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिमी तटरक्षक दलाने गुरुवारी या दुर्घटनेची माहिती दिली. आग लागल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले.

43 जणांना सुरक्षित बाहेर काढले

तटरक्षक दलाच्या माहितीनुसार, कोरोनच्या किनाऱ्याजवळ समुद्रात जहाजाला आग लागली. दुर्घटनेनंतर बचाव पथकांनी वेगाने हालचाली करत आतापर्यंत 43 जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तटरक्षक दलाने जारी केलेल्या दृश्यांमध्ये जहाजाच्या काही भागातून मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत आहेत. बचावकार्यादरम्यान मृत प्रवाशांचे मृतदेह बॉडी बॅगमध्ये ठेवतानाचे दृश्यही समोर आले आहे.

जहाजावर 117 प्रवासी आणि 17 क्रू मेंबर्स

तटरक्षक दलाच्या प्रवक्त्या कमोडोर नोएमी कायाब्याब यांनी दिलेल्या माहितीनुसार, जहाजाच्या प्रवासी यादीत 117 प्रवासी आणि 17 कर्मचारी नोंदवण्यात आले होते. आतापर्यंत बचावलेले आणि मृतांची संख्या लक्षात घेता 80 पेक्षा अधिक जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. मात्र ही प्राथमिक आकडेवारी असून बचावकार्य पुढे सुरू राहिल्यानंतर बेपत्ता व्यक्तींची संख्या बदलू शकते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मनीला येथून कोरोनच्या दिशेने प्रवास

हे जहाज मनीला येथील बेसेको परिसरातून कोरोनच्या दिशेने रवाना झाले होते. प्रवासादरम्यान जहाजाला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दल आणि इतर बचाव पथकांनी शोधमोहीम सुरू केली. समुद्रात बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू असून दुर्घटनेच्या कारणांचाही तपास केला जात आहे.

प्रसिद्ध पर्यटनस्थळाकडे जात होते जहाज

कोरोन हे फिलीपिन्समधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून स्वच्छ निळे पाणी, मोठमोठ्या चुनखडीच्या खडकांची रचना आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात समुद्रात बुडालेल्या जहाजांच्या अवशेषांसाठी ते ओळखले जाते. येथे मोठ्या संख्येने पर्यटक स्कूबा डायव्हिंगसाठी येतात. त्यामुळे या जहाज दुर्घटनेने चिंता वाढली असून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेणे आणि दुर्घटनेचे नेमके कारण शोधणे, ही सध्या बचाव यंत्रणांसमोरील प्रमुख आव्हाने आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT