President Rodrigo Duterte Dainik Gomantak
ग्लोबल

फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांचा राजकीय सन्यास, कन्या सारा दुतेर्ते-कार्पियो चालवणार वारसा?

राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते (President Rodrigo Duterte) यांच्या निवृत्तीनंतर त्यांची मुलगी सारा-कार्पियो पुढील वर्षी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार

Dainik Gomantak

फिलिपिन्सचे (Philippines) अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते (President Rodrigo Duterte) यांनी पुढील वर्षी त्यांचा कार्यकाळ संपणार असून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. मिळालेल्या अहवालानुसार, दुतेर्ते यांनी आपली मुलगी सारा दुतेर्ते-कार्पियो (Sara Duterte-Carpio) हिला पुढील वर्षी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. सारा सध्या फिलीपिन्समधील दावाओ शहरच्या महापौर आहेत. याशिवाय, उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सिनेटर क्रिस्टोफर 'बोंग गो' (Bong Go) हे असतील. राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांचे ते पूर्वीपासूनचे राजकीय भागीदार आहेत.

सारा दुतेर्ते यांनी यापुढे निवडणुकांमध्ये पुन्हा उभे न राहण्याचे बोलले होते. मात्र शनिवारी पुन्हा 'दावाओ' येथे महापौरपदासाठी पुढील निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज दाखल केला. प्राप्त अहवालानुसार, राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी असेही सांगितले की त्यांची मुलगी सारा पुढील वर्षी फिलिपिन्सच्या अध्यक्षीय निवडणुकीत आपला दावा मांडेल. तथापि, आतापर्यंत राष्ट्रपती, त्यांचे प्रवक्ते किंवा सिनेटर क्रिस्टोफर 'बोंग' गो यांच्याकडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

ABS-CBN ने दिलेल्या अहवालानुसार, रॉड्रिगो दुतेर्ते यांना जेव्हा त्यांच्या मुलीच्या राष्ट्रपती पदाचा अर्ज दाखल करण्याविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, "मला सध्या याविषयी कोणतीही माहिती नाही." तुम्ही मुलगी साराला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरण्याची परवानगी दिली आहे का? या प्रश्नावर अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते म्हणाले की, "तुमचे म्हणणे ठीक आहे, पण 'नाही', आम्ही राजकारणावर जास्त बोलत नाही." असे ते बोलले होते.

फिलिपिन्समध्ये पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर असून 15 नोव्हेंबर पर्यंत नामांकन मागे घेणे किंवा बदली करण्याची शेवटची तारीख आहे.

रॉड्रिगो दुतेर्ते यांनी शनिवारी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली

76 वर्षीय अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी शनिवारी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली पण राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, त्यांनी आपली मुलगी सारा हिची राजकीय कारकीर्द पुढे नेण्यासाठी घेतल्याचे बोलले जाते. दुतेर्ते यांनी यापूर्वी असेही सांगितले होते की ते पुढच्या वर्षी उपाध्यक्ष पदासाठी दावा करतील, परंतु दुतेर्ते ऐवजी आता सिनेटर क्रिस्टोफर 'बोंग गो' यांनी उपराष्ट्रपती पदासाठी नामांकन दिले आहे.

फिलिपिन्समधील राष्ट्रपतींचा कार्यकाळ सहा वर्षांसाठी मर्यादित असतो. दुतेर्ते यांनी पुढच्या वर्षी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला होता. दुतेर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीला विरोध करणार असल्याचेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT