china 
ग्लोबल

China: झिनजियांगमधील लोकसंख्या 48 टक्यांनी घटली; उइगर मुस्लिमांवर अत्याचारात वाढ  

दैनिक गोमंतक

चीनच्या झिनजियांग प्रांतातील अत्याचाराचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. चीनच्या पश्चिम प्रांतीय झिनजियांगमध्ये 2017 ते 2019 या कालावधीत लोकसंख्येच्या आकडेवारीत ऐतिहासिक घट नोंदली गेली आहे. चीन प्रांतात राहणाऱ्या लाखो उइगर मुस्लिमांवर चीन लगातार अत्याचार करत आहे. त्यांनी या प्रांतात यातना शिबीर सुरु केले आहे. या क्षेत्रामध्ये लोकसंख्या कमी होत आहे तेच या अन्यायाचे उदाहरण आहे. यावर ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजी पॉलिसी इन्स्टिट्यूटने पूर्ण अहवाल दिला आहे.अहवालानुसार, झिनजियांगमध्ये राहणाऱ्या उइगर मुस्लिम, कजाकी आणि इतर अल्पसंख्याक मुस्लिमांची लोकसंख्या 48.74 टक्क्यांनी घटली आहे. यात पळून जाणाऱ्या आणि ठार झालेल्या लोकांचा समावेश आहे. इतकेच नाही तर 2017 आणि 2018 मध्ये जन्म दरही 43.7 टक्क्यांनी कमी झाला आहे. या अलिकडच्या वर्षांत या क्षेत्रात 71 वर्षांत इतकी घट दिसून आली नाही. लोकसंख्येतील ही घट आतापर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या जनगणनेत प्रथमच दिसून आली आहे.

आकडेवारीत अशी घसरण सीरियन गृहयुद्ध, रवांडा आणि कंबोडिया या नरसंहारातही झाली नव्हती. संशोधन आणि अहवाल सह-लेखक नॅथन राउसर म्हणतात ही  लोकसंख्येतील घट अभूतपूर्व आहे. यावरून असे दिसते झिनजियांगमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या कमी करण्याची कारवाई केली जात आहे. येथे अधिकारी कशाप्रकारे अंकुश ठेवत आहेत?  झिनजियांगमधील जन्म दर कमी करण्याच्या नियोजित मार्गाने चीन गर्भपात, नसबंदी आणि अत्याचार आणि बाळंतपणासाठी दंड यासारख्या उपाययोजना करीत असल्याचे जर्मन संशोधक एडरियन जेंज यांनी गेल्या वर्षी केलेल्या अहवालालाही या अहवालात दुजोरा देण्यात आला आहे. चीन सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित या अहवालावर भाष्य केले नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी  न्यूझीलंड सरकारने चीनविरूद्ध मोर्चा बोलला होता. इथल्या संसदेने चीनमधील उइगर मुस्लिमांवरील अत्याचाराविरोधात एकमताने एक ठराव संमत केला होता. एसीटी पार्टी ऑफ न्यूझीलंडने उइगरवरील अत्याचाराच्या संदर्भात हा प्रस्ताव संसदेत मांडला होता. सर्व पक्षांनी या प्रस्तावावर चर्चा केली. नंतर सर्व पक्षांच्या संमतीने प्रस्ताव मंजूर झाला. या प्रस्तावाला उइगर मुस्लिमांवरील अत्याचारांना नरसंहार म्हटले गेले. सत्ताधारी पक्षाशी सल्लामसलत केल्यानंतर नरसंहार हा शब्द काढून टाकण्यात आला. त्याशिवाय हा संपूर्ण ठराव संमत झाला आहे होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT