Spain Court Verdict | Ivana Moral Dainik Gomantak
ग्लोबल

Spain court: पत्नीने 25 वर्षे केलेल्या घरकामाचा पगार द्या; कोर्टाचा पतीला दणका, रक्कम वाचून व्हाल थक्क

मुलींसाठी बालसंगोपन भत्ताही देण्याचेही पतीला आदेश

Akshay Nirmale

Spain Court Verdict: स्पेनच्या एका न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणात दिलेला निकाल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. येथील एका पुरुषाला त्याच्या माजी पत्नीला 2,00,000 युरो (दोन लाख युरो म्हणजे सुमारे 1.73 कोटी रुपये) देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

माजी पत्नीला 25 वर्षांपासून घरगुती काम करून देण्याच्या बदल्यात ही रक्कम देण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, पगाराची ही रक्कम ठरविण्यासाठी न्यायालयाने किमान वेतनाचा आधार घेतला आहे.

त्यानुसार गणना करून पगाराचा हा आकडा काढला आहे. याशिवाय मुलींना मासिक बालसंगोपन भत्ता देण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

खरं तर, स्पेनमध्ये 25 वर्षे एकत्र राहिल्यानंतर एका जोडप्याचा घटस्फोट झाला. या जोडप्याला दोन मुली आहेत. पती-पत्नीमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू झाला. विवाहित असताना जे काही कमावले ते स्वतःचे असल्याचे मत पतीने मांडले. त्यामुळे पत्नीचा त्यावर अधिकार नाही, असा युक्तीवाद त्याच्या बाजूने करण्यात आला.

त्याच वेळी, माजी पत्नीच्या वकिलाने सांगितले की, लग्न झाल्यानंतर पत्नीने स्वतःला घरातील कामात झोकून दिले होते. घर आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे काम तिने केले. यावर कोर्टाने कायदेशीर कागदपत्रांमध्ये हे देखील पाहिले की लग्नानंतर म्हणजेच जून 1995 ते डिसेंबर 2020 दरम्यान महिलेने किती कमाई केली.

कॅडेना सेर रेडिओ चॅनेलशी बोलताना या महिलेने तिची संपूर्ण कहाणी सांगितली. इव्हाना मोरल असे तिचे नाव आहे. तिने सांगितले की, तिच्या पतीला तिने घराबाहेर कोणतेही काम करावे असे वाटत नव्हते. तथापि, त्याने इव्हानाला त्याच्या जिममध्ये काम करू दिले.

तिथे इव्हानाने रिसेप्शन काऊंटर सांभाळले आणि मॉनिटर म्हणून काम केले. याशिवाय घरातील सर्व कामे ती सांभाळत होती. नवरा आणि मुलांची काळजी घेत होती.

त्यावर निकाल सुनावताना स्पेनमधील न्यायालयाने पतीला त्याच्या माजी पत्नीला किमान वेतनावर आधारीत घरकाम करण्यासाठी आत्तापर्यंतच्या एकूण 25 वर्षातील पगार म्हणून 1.79 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले.

याशिवाय मुलींना मासिक बालसंगोपन भत्ता देण्याचेही आदेश दिले. या दांपत्याच्या दोनपैकी एक मुलगी अल्पवयीन आहे, तर दुसरी 18 वर्षांहून मोठी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT