Papua New Guinea Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Papua New Guinea Earthquake: पापुआ न्यू गिनी पुन्हा भुकंपाने हादरले, रिश्टल स्केलवर 5.6 एवढी तीव्रती

पापुआ न्यू गिनीमध्ये आज सकाळी पश्चिम-वायव्य भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

दैनिक गोमन्तक

Papua New Guinea Earthquake: पापुआ न्यू गिनीमध्ये आज म्हणजेच बुधवारी (3 मे) 5.6 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पापुआ न्यू गिनीच्या वायव्येस असलेल्या अंबुंतीमध्ये भूकंप झाला. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अंबुंतीपासून 16 किमी अंतरावर पश्चिम-वायव्येला होता. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली 112 किमी होती, तरीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

याआधीही 3 एप्रिल रोजी पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.3 इतकी नोंदवण्यात आली होती. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्रानुसार, भूकंपाची खोली पृथ्वीखाली 38.2 किमी इतकी नोंदवण्यात आली.  

  • पापुआ न्यू गिनीमध्ये 4 महिन्यांत भूकंपाचे धक्के

पापुआ न्यू गिनी हा ओशिनियामधील देश आहे. येथे अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवतात. पापुआ न्यू गिनी भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जाते. मार्च महिन्यातही येथे दोनदा भूकंप झाला होता. पापुआ न्यू गिनीमध्ये 1 मार्च आणि 14 मार्च रोजी भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या महिन्यात एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

त्याचवेळी फेब्रुवारी महिन्यातही 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानुसार पापुआ न्यू गिनीमध्ये फेब्रुवारी ते मे या कालावधीत एकूण 5 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 

  • भूकंपाचे धक्के का जाणवतात

भूगर्भशास्त्रानुसार संपूर्ण पृथ्वी 12 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. जेव्हा जेव्हा या प्लेट्स आदळतात तेव्हा एक ऊर्जा सोडली जाते. या ऊर्जेलाच भूकंप म्हणतात. त्याच वेळी, ज्या ठिकाणी खडक तुटतात किंवा आदळतात त्या जागेला भूकंपाचे केंद्र किंवा हायपोसेंटर किंवा फोकस म्हणतात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT