Miyan Mohammad Mansha Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानचे 'अंबानी' मियां मोहम्मद मंशा यांचा शाहबाज सरकारला मोलाचा सल्ला !

Miyan Mohammad Mansha: पाकिस्तान सध्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. तज्ज्ञांच्या मते, 1971 नंतर पाकिस्तानसाठी ही सर्वात वाईट वेळ आहे.

दैनिक गोमन्तक

Miyan Mohammad Mansha: पाकिस्तान सध्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. तज्ज्ञांच्या मते, 1971 नंतर पाकिस्तानसाठी ही सर्वात वाईट वेळ आहे. पाकिस्तानी नागरिकांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. (Miyan Mohammad Mansha on Pakistan Economic Crisis)

दरम्यान, पाकिस्तानचे अंबानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मियां मोहम्मद मंशा यांचे एक वक्तव्य चर्चेत आहे, ज्यामध्ये ते पाक पंतप्रधानांना भारताच्या आश्रयाला जाण्याचा सल्ला देत आहेत.

कोण आहेत मियाँ मोहम्मद मंशा?

मियां मोहम्मद मंशा यांचा जन्म फैसलाबाद येथे 1947 मध्ये झाला, त्यांनी हेंडन कॉलेज लंडनमधून बॅचलर डिग्री घेतली आहे. मंशा यांच्या वडिलांची कॉटन मिल होती, जी त्यांनी एका नव्या उंचीवर नेली.

आज ती कॉटन मिल 'निशात कॉटन मिल' म्हणून ओळखली जाते. मंशा यांचा व्यवसाय बँकिंग, कापड, विमा, सिमेंट आणि वीज या क्षेत्रांमध्ये विस्तारला आहे.

दरम्यान, 2005 मध्ये ते पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उदयास आले. त्याचवेळी, 2010 मध्ये, त्यांना फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत देखील स्थान मिळाले, ते 937 व्या क्रमांकावर होते.

मंशा यांनी 2008 मध्ये मलेशियाच्या मेबँकसोबत एमसीबी बँक सुरु केली. 2022 मध्ये देखील, मंशा 5 अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह पाकिस्तानमधील (Pakistan) सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले. त्यामुळेच त्यांना पाकिस्तानचे 'अंबानी' देखील म्हटले जाते.

मंशा 2012 मध्ये चर्चेत आले होते

2012 मध्ये मियां मोहम्मद मंशा यांनी भारतात त्यांच्या बँकेच्या तीन शाखा उघडण्यासाठी अर्ज केला होता. त्यांना दिल्ली, मुंबई आणि अमृतसर येथे शाखा उघडायच्या होत्या.

त्यादरम्यान, मंशा यांनी असाही दावा केला होता की, पाकिस्तानच्या इतर बँकांना देखील भारतात व्यवसाय सुरु करायचा आहे, परंतु भारतात शाखा उघडण्याची मंशा यांची योजना पुढे जाऊ शकली नाही.

तसेच, संपत्तीच्या बाबतीत पाकिस्तानचे अंबानी मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) खूप मागे आहेत. जगातील 500 श्रीमंतांच्या यादीत एकाही पाकिस्तानी व्यक्तीचा समावेश नाही, तर भारतातील 20 श्रीमंत या यादीत आहेत.

दुसरीकडे, मालमत्तेच्या बाबतीत पाहिले तर, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $120 अब्ज आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $84.7 अब्ज आहे. 5 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली मंशा या शर्यतीत खूप मागे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT