TLP Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये माजला हत्तेचा कहर, पत्नीने इम्रान खान सरकारकडे मागितला न्याय

पाकिस्तानमध्ये संतप्त जमावाकडून एका श्रीलंकन ​​नागरिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हा जमाव तहरकी-ए-लब्बैक (TLP) समर्थकांचा होता. श्रीलंकेच्या संसदेनेही या घटनेचा निषेध केला आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानमध्ये (Pakistan) हिंसक झालेल्या लोकांनी गर्दी करत एका श्रीलंकन (Sri Lanka) ​​नागरिकाला बेदम मारहाण केली आणि जिवंत जाळल्याचे कृत्य समोर आहे आहे. या घटनेचा श्रीलंकेच्या संसदेने तीव्र निषेध केला आहे. एकीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान न्यायाचे आश्वासन देतात आणि हा पाकिस्तानसाठी लाजिरवाणा दिवस असल्याचे ही म्हटले आहे. प्रियंता कुमारा दियावदना असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावरती ईशनिंदा केल्याचा आरोप करून त्यांची निर्घृण पणे हत्या करण्यात आली आहे. आता त्यांच्या पत्नीने पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. पती निर्दोष असल्याचे तिने सांगितले आहे.

दियावदानाची हत्या तहरीक-ए-लब्बेक (TLP) पाकिस्तान या कट्टर इस्लामिक संघटनेच्या समर्थकांनी केली होती. शुक्रवारी संतप्त जमावाने प्रथम एका कारखान्यावर हल्ला केला आणि नंतर दियावदनाला मारहाण करून तिला जिवंत जाळले. या घटनेमुळे लोकांचा वाढता रोष पाहून पाकिस्तान सरकारने 800 हून अधिक लोकांवर दहशतवादी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 13 संशयितांसह 118 जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आहे.

दियावदानाचे वय 40 च्या जवळपास होते. तो 2010 मध्ये रोजगाराच्या शोधात पाकिस्तानात आला होता आणि 2012 पासून सियालकोट येथील एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करत होता. मृताच्या पत्नीने सांगितले की, 'माझ्या पतीच्या निर्घृण हत्येची बातमी मला माध्येमांमधून समजली आहे. नंतर मी इंटरनेटवरही पाहिले. तो निर्दोष होता. मी पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या नेत्यांना विनंती करते की, गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी व माझ्या पती आणि दोन मुलांना न्याय मिळवून द्यावा.

श्रीलंकेचे मंत्री नमल राजपक्षे आणि प्रसन्न रणतुंगा यांनी शनिवारी येथून सुमारे 22 किमी अंतरावर असलेल्या गनेमुल्ला येथील दियावदना यांच्या निवासस्थानी भेट दिली. पेरादेनिया विद्यापीठाचा पदवीधर असलेल्या दियावदना यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. पाकिस्तानमधील श्रीलंकेचे उच्चायुक्त व्हाईस अॅडमिरल मोहन विजेविक्रामा यांनी सांगितले की, सोमवारी विशेष विमानाने दियावदना यांचे पार्थिव लाहोरहून कोलंबोपर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दीवदना लाहोरपासून 100 किमी अंतरावर असलेल्या सियालकोट जिल्ह्यातील राजको इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT