Army Convoy Attack Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Terrorist Attack: एकामागून एक 3 वाहने उडवली... कराची-क्वेट्टा महामार्गावर पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, 32 सैनिक ठार

Army Convoy Attack Pakistan: पाकिस्तानने पोसलेला दहशतवादच आता त्यांच्यासाठी घातक ठरत चालला आहे. दहशतवाद्यांना पोसण्याची किंमत पाकिस्तानला आता चुकवावी लागत आहे.

Manish Jadhav

पाकिस्तानने पोसलेला दहशतवादच आता त्यांच्यासाठी घातक ठरत चालला आहे. दहशतवाद्यांना पोसण्याची किंमत पाकिस्तानला आता चुकवावी लागत आहे. खुजदारमधील झिरो पॉइंटजवळ कराची-क्वेट्टा महामार्गावर लष्कराच्या ताफ्यावर एका इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (VBIED) ने हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये 32 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि डझनभर जखमी झाले. पाकिस्तानातील दुर्गम भागातून दहशतवादी घटनांच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. आता पाकिस्तानच्या मोठ्या शहरांमध्येही असे हल्ले होऊ लागल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पार्क केलेल्या कारमध्ये स्फोट झाला

कराची-क्वेट्टा महामार्गाजवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये विस्फोटक ठेवण्यात आले होते. लष्कराचा ताफा तेथून जात असताना त्याचा स्फोट झाला. वृत्तानुसार, ताफ्यात आठ लष्करी वाहने होती, ज्यापैकी तीन वाहनांना थेट धडक बसली, ज्यामध्ये लष्करी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना घेऊन जाणाऱ्या बसचाही समावेश होता.

घटना लपवण्याचा प्रयत्न

अधिकारी ही सुरक्षा त्रुटी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. सूत्रांनुसार, अधिकारी कहाणी बदलण्याच्या प्रयत्नात या घटनेला स्कूल बसवरील हल्ला म्हणून दाखवत आहेत.

याआधीही हल्ला झाला

21 मे रोजी कराची-क्वेट्टा महामार्गावर आणखी एक हल्ला झाला होता. बलुचिस्तानमधील खुजदार शहराजवळ कराची-क्वेट्टा महामार्गावर मुलांना घेऊन जाणाऱ्या आर्मी पब्लिक स्कूलच्या बसवर दहशतवाद्यांनी (Terrorist) हल्ला केला, ज्यामध्ये ड्रायव्हरसह पाच मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पाकिस्तानातील सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप बऱ्याच काळापासून केला जात आहे. आता जेव्हा पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले वाढत आहेत, तेव्हा पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांची पोलखोल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT