Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पाकिस्तानच्या पंजाबमध्ये भीषण अपघात; ट्रक अन् बसच्या धडकेत 13 जण ठार

Pakistan News: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बस आणि ट्रकच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Punjab province: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बस आणि ट्रकच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी लाहोरपासून सुमारे 400 किमी अंतरावर रहीम यार खान जिल्ह्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऊस वाहून नेणाऱ्या ट्रकला बस धडकली. बसमध्ये एकूण 18 प्रवासी होते.

"अपघातानंतर, स्थानिक लोकांसह बचाव पथकाने जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल केले, जिथे 13 जणांना मृत घोषित करण्यात आले. तर उर्वरित पाच जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे," असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे.

बसला धडक

अपघात (Accident) झालेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातानंतर बस उसाच्या ढिगाऱ्याखाली आली. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी बचाव पथकाला बराच वेळ लागला, असे निवेदनात म्हटले आहे. ट्रकचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून, त्याचा शोध सुरु आहे.

स्फोटात तीन ठार, पाच जखमी

दुसरीकडे, पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तुनख्वा प्रांतात शनिवारी झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात तीन जण ठार तर पाच जण जखमी झाले. ही घटना उत्तर वझिरीस्तानमधील मीर अली तहसील भागात घडली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, 'दुचाकी भूसुरुंगावर आदळली, त्यामुळे दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT